लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : ईएसआयसीच्या वरिष्ठ राज्य वैद्यकीय आयुक्तांनी मंगळवारी वाळूज एमआयडीसीतील ईएसआयसी व संलग्न रुग्णालयाला भेटी देऊन झाडाझडती घेतली. या योजनेला संलग्न रुग्णालयात दर्जेदार व नि:शुल्क सुविधा पुरवा, अन्यथा करार रद्द करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व संलग्न हयात रुग्णालयात कामगार रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची ओरड होती. हयात रुग्णालयाकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करून डावात मचाळा पार्टीने गेल्या आठवड्यात पंढरपुरात आंदोलनही केले होते.या आंदोलनाची दखल घेऊन वरिष्ठ राज्य वैद्यकीय आयुक्त रेश्मा वर्मा यांनी मंगळवारी सकाळीच या भागातील ईएसआयसी व हयात हॉस्पिटलला भेटी देऊन वैद्यकीय अधिकाºयांना फै लावर घेतले. या दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांनी असमाधानकारक खुलासे केल्यामुळे आयुक्त वर्मा यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी के ली. याप्रसंगी डावात मचाळा पार्टीचे भरत फुलारे, प्रकाश जाधव, रामेश्वर नवले, मल्लेश कुर्रा आदींनी हयात हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे सांगितले. औषधी, विविध चाचण्यांसाठी या रुग्णालयाकडून अडवणूक करून रुग्ण व नातेवाईकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करून आवश्यक पुरावे आयुक्त वर्मा यांना दिले. तेथील रुग्णांशी आयुक्तांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले, संयुक्त निदेशक सुदर्शन, शाखा व्यवस्थापक कमलेश आगाशे, डॉ. व्यंकट जांभळे, डॉ.पृथ्वीराज राठोड आदींची उपस्थिती होती.अन्यथा संलग्नीकरण रद्दहयात हॉस्पिटलविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त वर्मा यांनी हॉस्पिटल प्रमुखांना ‘येथे सर्व प्रकारचे उपचार नि:शुल्क केले जातात’ असा बोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले. उपचारात कुचराई व नातेवाईकांकडून पैसे घेतल्यास ईएसआयसीशी असलेले टायअप रद्द करण्याचा इशाराही वर्मा यांनी दिला.
ईएसआयसीची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:04 IST