शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कार्यपूर्तीचा आनंद

By admin | Updated: August 11, 2014 01:55 IST

औरंगाबाद : एखादी मागणी होणे, ती समजावून घेणे, ती पूर्ण करणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्यात एक वेगळाच आनंद आहे, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी (दि.९) काढले.

औरंगाबाद : एखादी मागणी होणे, ती समजावून घेणे, ती पूर्ण करणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्यात एक वेगळाच आनंद आहे, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी (दि.९) काढले. टंकलेखन व लघुलेखनाच्या राज्यातील वाणिज्य शिक्षण संस्थांमध्ये संगणक टायपिंग प्रशिक्षण सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली असून त्यानुसार दोन संस्थांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष परवाने प्रदान करण्याचा सोहळा राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शहरात संपन्न झाला. राज्यातील वाणिज्य शिक्षण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष लालचंद चांदीवाल अध्यक्षस्थानी होते. आ. विक्रम काळे, शिक्षण संचालक अनिल भानप, संघटनेचे नेते प्रकाश कराळे, शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे, उपायुक्त भाऊसाहेब सोनवणे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, बोर्डाचे सदस्य किरण पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आ. विक्रम काळे म्हणाले, अगदी कमी वेळात शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी पूर्ण केली व त्याची अंमलबजावणीही विक्र मी वेळेत होते आहे. काम करणारे कोण आहेत हे तुम्ही ओळखा, असे ते म्हणताच सभागृहात राजेंद्र बाबू दर्डा यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी झाली. शिक्षण संस्थेतर्फे राजेंद्र दर्डा यांचा यानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. चांदीवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला. सरदारसिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले. राजेंद्र वाणी, शेवाळे, मोहन भूमे, संतोष दाणे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. राजेंद्र दर्डा म्हणाले, टायपिंग मशीन कालबाह्य झाल्या. त्यांचे सुटे भागही आता मिळत नाहीत. शिवाय सर्व खासगी, शासकीय कार्यालयांतून ई-वर्किंग सुरू झाले. त्यामुळे संगणकाचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या संस्थांची गरज होतीच. मागील अनेक वर्षांपासून टंकलेखन व लघुलेखन शिकवणाऱ्या संस्था कार्यरत आहेत व त्यांची ही मागणी होती. या संस्थांना मदत करणेही गरजेचे होते. लोकोपयोगी निर्णय घेणे हे सरकारचे काम असते, त्यानुसार निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. यासाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रमही सुंदर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.