शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: July 16, 2016 01:12 IST

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये जिल्हा तसेच तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे.लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यकांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकी व विनंती बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यात यावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जॉबचार्ट, कर्तव्यसूची निश्चित करावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्याप्रमाणेच लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सर्वस्तरीय नि:शुल्क सवलत मिळावी, वाहनचालकांप्रमाणे अतिरिक्त भत्ता मिळावा, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मूळवेतन मिळण्यासाठी २२ एप्रिल २००९ रोजीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, जिल्हा निवड समितीद्वारे किंवा ‘एमपीएससी’द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी लिपिकांना ४५ वर्ष वयोमर्यादेपर्यंत परीक्षेला बसण्याची सवलत मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कार्यालय सुरू झाल्यापासूनच कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले. दुपारी १ वाजेपर्यंत कर्मचारी कुठलेही काम न करता कर्मचारी आपपाल्या जागेवर बसून होते. दुपारनंतर तर बहुतांश कार्यालयामध्ये रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन झाले. जोपर्यंत शासन न्याय मागण्यांचा विचार करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा संघटनेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष भास्कर कोल्हे, उपाध्यक्ष राहुल माने, सचिव ऋषिकेश पिंगळे यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)