सोयगाव : खरिप पिकांवर वन्य प्राण्यांच्या धुडगूस आणि मुक्त संचारामुळे सोयगाव परिसरातील अकरा गावांमधील शेतकरी वैतागले आहेत. वन विभागाकडून मात्र बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले असून, याची जबाबदार अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
सोयगाव परिसरातील काही गावांचे शिवार डोंगराच्या पायथ्याशी असून त्यांनी कपाशी, तूर, मूग, मका, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत; मात्र रोहींच्या कळपांसह इतर वन्य प्राणी मुक्त संचार करून या पिकांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फलोत्पादनच्या वळणावर आलेल्या खरिप हंगामाचे नुकसान होत आहे; मात्र या नुकसानाच्या भरपाईसाठी वन विभागाकडून ऑनलाइन प्रक्रियेबाबत जनजागृती होत नसल्याची स्थिती आहे. या नुकसानाची पाहणीही करण्यात येत नसल्याने वन विभागाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे. सोयगाव, रावेरी, कंकराळा, जरंडी, हिवदखोरा, धिंगापूर, निंबायती, कवली, बहुलखेडा, निमखेडी, घोसला, काटीखोरा आदी भागात वन्य प्राण्यांचा धुडगूस वाढला असून, रोहींच्या कळपांनी शेती शिवार ताब्यात घेतले आहे.
---अकरा गावांमध्ये मोठे नुकसान----
सोयगावसह अकरा गावांमध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कोवळ्या पिकांसह फुलपत्यावर आलेल्या मूग, चवळी, कपाशी आदी पिकांचे वन्य प्राण्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वन विभागाकडून पंचनामासुद्धा झाला नसल्याने नुकसानाची आकडेवारी हाती आलेली नव्हती.
--- फोटो
210721\img-20210721-wa0156.jpg~210721\img-20210721-wa0151.jpg
सोयगाव-सोयगाव परिसरात वन्य प्राण्यांच्या मुक्त संसागरात पिकांचे नुकसान~सोयगाव-वन्यप्राण्यांचा नुकसानीत बाधित पिकांची पाहणी करतांना शेतकरी