परभणी: आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत परभणी- विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरारी पथक व चेकपोस्ट उभारले असून १२ सप्टेंबरपासून आतापर्यंत या पथकाने ११ लाख ४६ हजार ४८० रुपयांचा माल जप्त केला आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३९ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी अवैध दारु विक्रीविरुद्धही धाडसत्र सुरु केले. यात देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. ही दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेले दोन टेम्पो, तीन मोटारसायक, लोडींग रिक्षा, सायकल रिक्षा अशी वाहनेही पोलिसांनी जप्त केली. जवळपास ११ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतच्या कारवाईत एक पिस्टल, सहा काडतूस व एक खंजीर जप्त करण्यात आला. तसेच भरारी पथकाच्या कारवाईत मतदारांना पैसे वाटप करीत असताना दोन लाख १४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. वाहनांच्या तपासणी दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत वाहनासह १ लाख २० हजार रुपये जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)आरोपीस पकडलेपरभणी: भरारी पथकातील कर्मचारी सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, अण्णा मानेबोईनवाड यांनी गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच घरफोडी प्रकरणात फरार असलेल्या भागोज इंद्रोबा पवार यास पाथरी तालुक्यातील फुलारवाडी येथून ४ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)
अकरा लाखांचा माल जप्त
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST