शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस मनाई

By admin | Updated: November 9, 2016 01:28 IST

औरंगाबाद : वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील

औरंगाबाद : वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्या. ए. एम. बदर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंध केला आहे. याचिकेची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी जाहीर झालेले आरक्षण बदलण्यात आल्याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे प्रतिबंध केला आहे. या प्रकरणी शिल्पा दिनेश परदेशी यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, ५ आॅक्टोबर २०१६ रोजी वैजापूर नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद हे ‘खुला प्रवर्ग महिला’ यासाठी आरक्षित झाले आणि तसे जाहीर करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही तसे प्रसिद्ध करण्यात आले.मात्र, नगरविकास विभागाचे सहसचिव यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, प्रादेशिक संचालक आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २० आॅक्टोबर १६ रोजीच्या पत्रान्वये नगरपालिका व नगर पंचायत अध्यक्षपद आरक्षणाबाबत कळविले.या पत्रानुसार वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद हे ‘खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)’ या प्रवर्गात दर्शविण्यात आले. या पत्राला याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की अशा प्रकारे आरक्षणात बदल करणे हे महाराष्ट्र नगरपालिका (अध्यक्षपद थेट निवडणूक) कायद्यातील नियमानुसार बेकायदा आणि कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे.एकदा सोडत काढल्यानंतर फेरसोडतीची कायद्यात तरतूद नाही. पहिल्या सोडतीद्वारे जाहीर झालेले ‘महिला खुला प्रवर्ग’ आरक्षण बदलता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे.सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना वैजापूर नगरपालिका अध्यक्षपद निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यास प्रतिबंध करून पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवली आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आर. एन. धोर्डे, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. शिवाजी टी. शेळके, शासनातर्फे पी. एस. पाटील आणि हस्तक्षेपकातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित यांनी काम पाहिले.