लोहारा : तालुक्यातील वडगाव ( गां.) येथे शुक्रवारी रात्री गुप्तधनासाठी खोदकाम करताना आठजणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रविवारी उमरगा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी सपोनि शाहुराज भिमाळे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात महम्मद बाबू सय्यद, काशिनाथ दणाने (दोघे रा.वडगाव गांजा, ता.लोहारा), दिगंबर पन्हाळकर, प्रशांत व्यंकट भोसले, दशरथ महादेव अव्हाड, हणमंत प्रेमनाथ थोरात, रवी गोकुळ चव्हाण, भिमाशंकर काशाप्पा गुत्तेदार, गोकुळनाथ प्रभाकर गोसावी, संतोष एकनाथ पाटील, सुनील हणमंत काकडे (सर्व रा.पुणे ) या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दरम्यान, यातील भोंदूबाबासह तिघेजण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)
खोदकामप्रकरणी आठजणांना जामीन
By admin | Updated: February 8, 2016 00:17 IST