शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ईद-उल-फित्र उत्साहात

By admin | Updated: July 19, 2015 00:57 IST

जालना : जिल्ह्यात मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी सर्वत्र ईद-उल-फित्र साजरी झाली. यानिमित्ताने ठिकठिकाणचे ईदगाह मैदान व मशिदींमध्ये

जालना : जिल्ह्यात मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी सर्वत्र ईद-उल-फित्र साजरी झाली. यानिमित्ताने ठिकठिकाणचे ईदगाह मैदान व मशिदींमध्ये नमाज अदा करून पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.जुना जालना ईदगाहमध्ये मुफ्ती अब्दूल रहेमान यांनी नमाज पठण केले. पावसासाठी तसेच देशाच्या उन्नतीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. तत्पूर्वी एकबाल पाशा, मौलाना गुफरान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वधर्म समभाव, शांतता व भाईचाऱ्याचा संदेश देऊन इस्लाम शांतीचा धर्म आहे, मुस्लिम बांधवांनी पैगंबर मोहम्मद यांच्या तत्वाचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, माजी खासदार अंकुशराव टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसीलदार रेवननाथ लबडे, बाबूराव सतकर, पंडितराव भुतेकर आदींनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिली. याप्रसंगी मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, सत्संग मुंढे, राम सतकर, गणेश सुपारकर, मोहन इंगळे, अय्यूब खान, अ‍ॅड. अर्शद बागवान, अ‍ॅड. सोहेल सिद्धीकी, मोहम्मद इफ्तेखारोद्दीन तय्यब देशमुख, नवाब डांगे, अहेमद नूर, शेख महेमूद, बदर चाऊस, फेरोज मौलाना, लतीफ कादरी आदींची उपस्थिती होती. नवीन जालन्यात सदर बाजार ईदगाहमध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आली. काजी मोईनोद्दीन यांनी नमाज पठण केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, गणेश राऊत, विनीत साहनी, नंदू जांगडे, नूरखान, आलमखान पठाण, जहीर सौदागर आदी उपस्थित होते.गांधीनगर ईदगाहमध्ये मौलाना नद्वी जब्बार यांनी नमाज पठण केले. यावेळी अकबरखान, नगरसेवक शेख आरेफ, सरपंच राऊफ, शेख करीम, अमीनोद्दीन, गुलाम यशदानी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुक्तेश्वर प्रवेशद्वार येथे रामभाऊ सतकर व गणेश सुपारकर यांच्या वतीने केशरी दुधाचे वाटप करण्यात आले.जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून पाऊस गायब झालेला आहे. पावसाअभावी पिके करपून जात आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. सर्वधर्म समभाव हा संदेशही प्रत्येक मशिदींमध्ये मौलानांनी दिला.