शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

ईद हर्षोल्हासात़़़़!

By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST

बीड : पवित्र रमजान ईदचा सण मंगळवारी जिल्ह्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. महिनाभर उपवास ठेवून सोमवारी चंद्रदर्शनानंतर मंगळवारी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली.

बीड : पवित्र रमजान ईदचा सण मंगळवारी जिल्ह्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. महिनाभर उपवास ठेवून सोमवारी चंद्रदर्शनानंतर मंगळवारी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिमबांधवांनी अल्लाहकडे पावसासाठी दुआँ मागितली. त्यानंतर ईदनिमित्त आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या़ईदनिमित्त मंगळवारी नवीन ईदगाह येथे सकाळी ९ वाजता, तकिया मस्जिद येथे ९़१५ वाजता, मर्कज मस्जिद, शहेंशहावली दर्गाह, जामा मस्जिद, मदरसा मजाहिरउलूम येथे सकाळी ९़ ३० वाजता, खाजा गरीब नवाज येथे ९़४५ वाजता, जुन्या ईदगाह येथे १० वाजता, बालेपीर दर्गाह येथे १०़१५ वाजता नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, माजी आ. सय्यद सलीम, न. प. उपाध्यक्ष हाजी नसिम इनामदार, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सभापती संदीप क्षीरसागर, प्रा़ सुशीला मोराळे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सर्वांना आमंत्रण दिले. यावेळी शिरकुरमा व गोडधोड पदार्थांची मेजवानी देण्यात आली. ईदगाह मैदानावर बंदोबस्त ठेवला होता.परळीत ईद साजरीपरळी येथे नेहरु चौक, ईदगाह, पंचायत समिती कार्यालयासमोरील ईदगाह, मलिकपूरा येथील ईदगाह, व नवीन ईदगाह येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज अदा केली. यावेळी शहरातील हजारो बांधव सहभागी होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यानंतर शिरखुर्म्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घरोघर गोडधोड पदार्थांचीही रेलचेल पहवयास मिळाली.गेवराईत हजारो बांधवांकडून नमाज अदागेवराई शहरातील ईदगाह मैदानावर रमजाननिमित्त नमाज अदा करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. आ. अमरसिंह पंडित, आ. बदामराव पंडित, सभापती युधाजित पंडित, जि.प. सदस्य विजयसिंह पंडित, संजय काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अजय दाभाडे, भाजपाचे अ‍ॅड. लक्ष्मण पवार, मनसेचे राजेंद्र मोटे, काँग्रेसचे अ‍ॅड. सुरेश हात्ते आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. घरोघर शिरकुरमा व गोडधोड पदार्थ बनविले होते़ मुस्लिम बांधवांनी सर्वांना निमंत्रण दिले़माजलगावात ईद उत्साहातमाजलगाव येथे ईदगाह मैदान, मनूरवाडी रोड, पालिकेजवळील मस्जिद येथे ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. यावेळी आ. प्रकाश सोळंके, भाजपचे आर. टी. देशमुख, भाई गंगाभिषण थावरे अरुण राऊत, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, अशोक डक, माजी आ. राधाकृष्ण होके, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे, कचरु खळगे, शिवाजी रांजवण, आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ़ उध्दव नाईकनवरे यांनी मुस्लिम बांधवांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या़धारुरमध्ये ईद साजरीधारुर येथील ईदगाह मैदानावर ईद साजरी झाली़ माजी नगराध्यक्ष डॉ़ स्वरुपसिंह हजारी, भाजप तालुकाध्यक्ष अशोक करे लक्ष्मणराव सिरसट, नामदेवराव शिनगारे, सुनील पिलाजी, बालाजी जाधव, राम शेळके, तहसीलदार संदीप कुलकर्णी, निरीक्षक बाबूराव पानपट्टे, अ‍ॅड़ मोहन भोसले, अजित सिरसट, धोंडीराम गायसमुद्रे यांनी शुभेच्छा दिल्या़ शहरात उत्साहाचे वातावरण होते़ (प्रतिनिधींकडून)शिरखुर्मा, गोडधोड पदार्थांची रेलचेलरमजानचे मुस्लिम बांधवांमध्ये मोठे महत्त्व आहे. रमजाननिमित्त बांधवांनी महिनाभर उपवास ठेवले होते.सोमवारी चंद्रदर्शन झाल्यावर मंगळवारी ईद साजरी करण्यात आली.सकाळपासूनच घरोघर प्रचंड उत्साह होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सकाळीच स्रान करुन नवे कपडे परिधान केले.त्यानंतर अत्तर लावून नमाज पठणासाठी हजेरी लावली. बीड शहरात ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी हजारो बांधव एकत्रित आले होते.यावेळी ‘रहेमत की बारिश अदा फर्माह...’ अशा शब्दांत पावसासाठी अल्लाहकडे दुवॉ मागितली. शिवाय विश्वशांतीचीही दुवॉ मागितली.शिरखुर्मा, गोडधोड पदार्थांची घरोघर रेलचेल होती़रमजान निमित्त दिवसभर उत्साहाचे वातावरण होते़