लातूर : आपल्या पाल्याच्या भावी करिअरचा पाया घालणार्या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये सहभागी होणार्या शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढला आहे़ आजपर्यंत ३० महाविद्यालये आणि संस्थांनी सहभाग नोंदवला आहे़ ६ जूनपासून सुरू होणार्या या प्रदर्शनात सहभाग घेणार्या संस्था आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढत चालला आहे़ लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये आतापर्यंत डी.बी. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, महाळंग्रा, एस.एस.टी. आर्ट कॉलेज आॅफ फॅशन डिझाईन लातूर, सिंहगढ इन्स्टीट्यूट पुणे, सुमन संस्कार प्रेप स्कूल, लातूर, सृजन अॅनिमेशन पुणे, स्टेट बँक आॅफ इंडिया लातूर, द व्हर्टेक्स अकॅडमी लातूर, एऩबी़एस इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक औसा, कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चर अॅन्ड बिझनेस मॅनेजमेंट लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक हासेगाव, जामीआ पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरींग कॉलेज, त्रिपुरा सायन्स कॉलेज लातूर, युनिक अकॅडमी लातूर, एमडीए इन्स्टीट्यूट आॅफ पॉलिटेक्निक अँड एमसीए कोळपा, एम़ई़ एस़ कॉलेज आॅफ आॅप्टोमेट्री पुणे, भिमाण्णा खंड्रे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी भालकी, डॉ़डी़वाय़ पाटील एज्युकेशनल कॅम्पस (आकुर्डी), चन्नबसवेश्वर ज्युनियर कॉलेज, लातूर, व्हीडीएफ स्कूल आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लातूऱ, शेळगावकर युनिक करिअर अकॅडमी लातूर, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे़ गुब्बी प्रिकास्ट आदी संस्था, इन्स्टिट्यूट सहभागी झाले आहेत. ८ जून पर्यंत चालणारे शैक्षणिक प्रदर्शन टाऊन हॉल मेन रोड, लातूर येथे असणार आहेत़ या प्रदर्शनाचे सहप्रायोजकत्व हे डी़बी़ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स आणि राजीव गांधी पॉलिटेक्निक हासेगाव या महाविद्यालयांनी स्विकारले आहेत़ या प्रदर्शनाच्या माध्यमातून पालक आणि पाल्य यांच्या मनात भावी शिक्षणाविषयी अनेक शंका-कुशंका असतात, त्या शंकांचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे़ एकाच छताखाली ज्युनियर के़जी़ ते पी़जी़ शैक्षणिक माहितीचा खजीनाच उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि पैश्याची बचत होणारआहे़ (प्रतिनिधी)प्रदर्शनाला भेट देणार्यांपैकी दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत़ या योजनेमुळे शहर आणि जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये या प्रदर्शनाचे आकर्षण निर्माण झाले आहे़ अशा प्रकारचे प्रदर्शन लोकमततर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे़
लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये शिक्षण संस्थांचा सहभाग वाढला
By admin | Updated: June 5, 2014 00:46 IST