शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी कडूस बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:01 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना तिसºया अपत्यामुळे नोकरी गमवावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना तिसºया अपत्यामुळे नोकरी गमवावी लागली. शासनाने आज शुक्रवारी त्यांना तडकाफडकी बडतर्फ केले.शिक्षणाधिकारी अशोक कडूस हे अहमदनगर येथून बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत २६ जुलै रोजी रुजू झाले. जिल्ह्यातील प्राथमिक विभागाची संपूर्ण माहिती घेण्यापूर्वीच बरोबर दहाव्या दिवशी त्यांच्यावर बडतर्फीची कुºहाड कोसळली. बडतर्फीचा आदेश मिळताच ते तातडीने दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. यासंदर्भात त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही.२००५ पासून शासन नियमानुसार शासकीय सेवेत रुजू होताना दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. तथापि, अशोक कडूस यांना तीन अपत्ये होती. ते २०१३ च्या बॅचचे शिक्षणाधिकारी आहेत. तेव्हा त्यांनी आपणास दोन अपत्ये असून, एक अपत्य हे दुसºयाला दत्तक म्हणून दिलेले आहे, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. यासंदर्भात शासनस्तरावर चौकशी सुरू होती. दरम्यान, आज जवळपास १२.३० वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात बसलेले असतानाच त्यांना शासनाने बडतर्फीचा निर्णय घेतल्याची माहिती समजली. तेव्हा ते कोणालाही काही न सांगता जिल्हा परिषदेतूनच थेट मुंबईला रवाना झाले.यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली असता ते म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी माहिती विचारण्यासाठी आपण शिक्षणाधिकारी कडूस यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा संपर्क होत नव्हता.शेवटी शिक्षण विभागातील कर्मचाºयांना कडूस कुठे आहेत, अशी विचारणा केली तेव्हा शासनाने त्यांना बडतर्फ केले असून ते मुंबईला गेले असल्याची माहिती मिळाली. परंतु त्यांनी मुख्यालय सोडताना किमान कल्पना तरी द्यायला पाहिजे होती. ते कोणालाही न सांगता बाहेरगावी निघून गेले आहेत. त्यांच्या या कृतीबद्दल आपण त्यांना नोटीस बजावणार आहे.