शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजाला रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:16 IST

मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडूनही कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडूनही कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्याने व या तक्रारी थेट विधानसभा आणि विधानपरिषदेपर्यंत पोहचल्याने त्यांची ३१ आॅगस्ट रोजी पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्प संचालकपदी बदली झाली. त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे यांच्याकडे सोपविण्यात आला.सवडे यांच्याकडे यापूर्वीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा पदभार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे हे पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यावेळीपासून त्यांच्यापदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रकल्प संचालक सवडे यांच्याकडे एकूण तीन पदभार आहेत.प्रत्येक पदभारासंदर्भात वेगवेगळ्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होत असल्याने या बैठकांना हजर राहण्यासाठी ते बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे १७ सप्टेंबरचा ध्वजारोहणाचा दिवस वगळता गेल्या ८ दिवसांपासून ते जिल्हा परिषदेत आलेलेच नाहीत. परिणामी स्वाक्षरीअभावी जि.प.तील अनेक फाईली प्रलंबित आहेत.याशिवाय जि.प.तील लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे पद गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रिक्त आहे. या पदाचा पदभार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असे असताना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभारही वसूकर यांच्याकडेच आहे. वसूकर यांच्याकडे आता तीन विभागाचा पदभार असल्याने प्रत्येक विभागाच्या कामाला न्याय देणे त्यांना अवघड जात आहे. परिणामी तिन्ही विभागांच्या फाईली प्रलंबित राहत आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेकाने यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ.मेकाने यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामही अनेक वेळा रेंगाळत आहे. रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सत्ताधाºयांकडूनही फारसी हालचाल होताना दिसून येत नाही. जि.प.त राष्ट्रवादी- भाजपा सत्तेत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत राष्ट्रवादीला भाजपाची मदत होणार आहे. परंतु, तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. परिणामी विकासकामे ठप्प होत आहेत.