शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकपमध्ये कमावले; ग्रामसभेत गमावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:58 IST

नुकत्याच पार पडलेल्या वॉटरकप स्पर्धेत एकूण १८ लाखांचे बक्षीस मिळवून सर्वत्र कौतुक झालेल्या पठाण मांडवा येथे स्वातंत्र्यदिनी स्पर्धेनंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : नुकत्याच पार पडलेल्या वॉटरकप स्पर्धेत एकूण १८ लाखांचे बक्षीस मिळवून सर्वत्र कौतुक झालेल्या पठाण मांडवा येथे स्वातंत्र्यदिनी स्पर्धेनंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हे नोंद झाले आहेत.अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा या गावाने वॉटरकप स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत प्रचंड मेहनत घेत बक्षिसावर गावाचे नाव कोरले. या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येत १८ लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम प्राप्त केली. यामुळे पठाण मांडवा गावाचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु, गावाला हा मान मिळाल्यानंतर जेमतेम १५ दिवसाच्या आतच या विजयाला डाग लावणारी घटना घडली आहे. पठाण मांडव्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत वादावादी होऊन एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मन्मथ मारोती इरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ग्रामसभेत १४ वित्त आयोगातून ग्राम पंचायतीला आलेल्या निधीच्या विनियोगाबद्दल तसेच घरकुलासंदर्भात कथितरीत्या सुरु असलेल्या दिशाभुलीबद्दल प्रश्न विचारले. फेरफार आकारणी कोणालाही विश्वासात न घेता आॅनलाईन कशी काय टाकली याबाबतही प्रश्न विचारले. यावर प्रमोद प्रल्हाद गुजर, नितीन सोमनाथ रूद्राक्ष आणि महालिंग बाळासाहेब रूद्राक्ष या तिघांनी चिडून तू नेहमी याच विषयांवर चर्चा का करतोस असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर याविषयी काही विचारलेस तर तुला जिवंत सोडणार नाहीत, अशी धमकी दिल्याचेही मन्मथ इरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.