शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये उमेदवार कोण याचीच उत्सुकता

By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST

मधुकर सिरसट , केज राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले़

मधुकर सिरसट , केजराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले़ त्यामुळे विधानसभेत काय चित्र राहते? हे पाहणे रोमांचक ठरेल़ तूर्त उमेदवारीवरुनच भाजपा व राष्ट्रवादीत खल सुरु आह़ त्यामुळे आखाड्यात कोणाची कोणासोबत झुंज होते, याचीच सर्वांना उत्कंठा आहे़मागील अनेक वर्षांपासून राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात कै़ विमल मुंदडा यांचा एकछत्री अंमल राहिला़ शिवसेना, भाजपाकडून प्रत्येकी एकदा तर राष्ट्रवादीकडून सलग तीन टर्म त्या विधानसभेत निवडून गेल्या़ ‘ओन्ली विमल’या नाऱ्याने सामान्यांच्या हृदयाचा ठाव घेतला होता़ त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे या नवख्या तरुणाला मतदारांनी संधी दिली़ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यातच कायम रंगतदार लढती झालेल्या आहेत़ यावेळी वेगळी स्थिती नाही़ विमल मुंदडा, गोपीनाथराव मुंडे यांच्या निधानाने दुसऱ्या फळीतील कार्यकर्र्त्यांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे, विमल मुंदडा यांच्या स्रुषा नमिता अक्षय मुंदडा ही दोन नावे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत़ विमल मुंदडा यांच्यानंतर मिळालेल्या संधीची परतफेड म्हणून आ़ साठे हे स्पर्धेतून माघार घेऊ शकतात़ भाजपात मात्र, उमेदवारीवरुन सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे़ नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या प्रा़ संगीता ठोंबरे या गतवेळच्या भाजपाच्या उमेदवार आहेत़ दुसरीकडे भारिपशी फारकत घेऊन बहुजन विकास मोर्चाची स्थापना करणारे बाबूराव पोटभरे हेदेखील प्रबळ दावेदार मानले जातात़ लोकसभा निवडणुकीत मुंडेंच्या मदतीला ते धावून गेले होते़ मुंडे यांच्या निधनाने उमेदवारीसाठी इच्छुकांना पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालावे लागणार आहे़ त्यामुळे पक्ष कोणाला संधी देतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे़ राष्ट्रवादीचे रमेश आडसकर, अंबाजोगाईचे राजकिशोर मोदी नंदकिशोर मुंदडा यांचाही या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे़ त्यांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण आहेत़ सलग तीन टर्म व पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी देणारा येथील मतदारराजा यावेळी काय करतो? याचे उत्तर निकालानंतरच मिळेल़२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेराष्ट्रवादीपृथ्वीराज साठे८५,७५०भाजपाप्रा.संगीता ठोंबरे७७,४४४अपक्षअ‍ॅड़ शिवाजी कांबळे२,२८१इच्छुकांचे नाव पक्षपृथ्वीराज साठे राकाँ.नमिता मुंदडाराकाँप्रा़ संगीता ठोंबरेभाजपाबाबूराव पोटभरेभाजपा