शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दंड वसुलीसाठी ग्रामीण पोलीसांकडे ‘ई चलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:14 IST

कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांना बुधवारपासून ई चलन देण्यास सुरुवात केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांना बुधवारपासून ई चलन देण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी याबाबतचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाºयांना देण्यात आले.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या की, एका खाजगी आय. टी. कंपनीच्या मदतीने पोलिसांनी ई चलन मशीनचा वापर सुरू केला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडे अनेकदा पैसे नसतात, अशा वेळेस वाहन परवाना जप्त करून त्यांना चलन देऊन एक तर कोर्टात हजर होण्यास सांगितले जाते अथवा वाहतूक शाखेत दंड भरून वाहनपरवाना घेऊन जाण्यास सांगितले जाते. वाहनचालकांची सोय व्हावी आणि कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य द्यावे, या हेतूने ग्रामीण पोलिसांनी ई चलन सुविधा सुरू केली. वाहनचालकांना आता डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे दंडाची रक्कम भरणे शक्य होईल. यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ई चलन मशीन वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या.या मशीनमध्ये वाहन नंबर आणि वाहनचालकाचा मोबाइल नंबर टाकल्यानंतर त्या वाहनावर यापूर्वी किती केसेस करण्यात आल्या, वाहन चोरीचे आहे अथवा नाही, यापूर्वी वाहतूक नियम मोडल्यामुळे त्यांनी दंडाचा भरणा केला अथवा नाही, याबाबतची माहिती एका सेकंदात दिसेल, अशी माहिती ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले.वाहनचालक आणि वाहनाचे छायाचित्र घेण्याची सुविधा या मशीनमध्ये आहे. हे यंत्र ब्ल्यू ट्रुथच्या माध्यमातून संगणकाशी कनेक्ट केले जाईल आणि त्यातील रोजचा डाटा संगणकात हस्तांतरित होईल.