शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून उडणार धुरळा

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारांनी प्रचार सुरू केला असला, तरी प्रचाराचा धुरळा मात्र बुधवारपासून उडणाार आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारांनी प्रचार सुरू केला असला, तरी प्रचाराचा धुरळा मात्र बुधवारपासून उडणाार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १ आॅक्टोबर रोजी शहरात मुक्कामी येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण यांनी दिली. बुधवारी शरद पवार हे सायंकाळी ५ वाजता कन्नड येथे, तर सायंकाळी ७.३० वाजता फुलंब्री येथे सभा घेणार आहेत.गुरुवारी सकाळी ११.३० वाजता त्यांची वैजापूर येथे जाहीर सभा होणार आहे. यामुळे बुधवारपासून मोठ्या सभा जिल्ह्यात सुरू होणार आहेत. प्रचारासाठी केवळ पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने या कालावधीत जिल्ह्यात प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. सध्या उमेदवारांचा पदयात्रा आणि विविध गावांत, तसेच घरोघरी जाऊन प्रचारावर भर आहे. आणखी दोन दिवस हेच वातावरण राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने जाहीर सभांचा धडाका सुरू होणार आहे. राज ठाकरे यांची २ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत सभामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाड्यातील पहिली जाहीर सभा येत्या २ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.