शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण राजकारणाचा उडणार धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST

जिल्ह्यात आचारसंहिता लागू :१५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारी रोजी मतमोजणी औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण राजकारणाचा धुराळा उडणार ...

जिल्ह्यात आचारसंहिता लागू :१५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारी रोजी मतमोजणी

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण राजकारणाचा धुराळा उडणार आहे. ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या तसेच डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ६११ अशा एकूण ६१८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात ५० टक्के किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या पूर्ण जिल्ह्यात आचार संहिता लागू राहणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ८६५ ग्रामपंचायतींपैकी ६१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुट्या वगळून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ जानेवारी असून त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा. ते सायं. ५.३० वा. या वेळेत मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. विधानसभा मतदारसंघनिहाय २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

लोकअदालतमध्ये जुळून आले १५ संसार

औरंगाबाद : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे कौटुंबिक वादविवादाच्या घटना वाढत असून कौटुंबिक न्यायालयाने लोकअदालतच्या प्रमुख न्यायाधीश आय.जे. नंदा यांच्या उपस्थितीत १५ जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश मिळविले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कौटुंबिक न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे कौटुंबिक न्यायालय इमारत येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश ए.ए. आयाचित यांची उपस्थिती होती. कौटुंबिक न्यायालयात एकूण ४३ प्रकरणे होती. त्यात दोन्ही बाजूची ३० जोडपी हजर राहिली व एकूण २७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. १३ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले, तर १५ प्रकरणांमधील जोडपी आनंदाने एकत्र नांदण्यास गेली. पॅनल क्र. १ वर निवृत्त न्यायाधीश टी.बी. जाधव, अ‍ॅड माधुरी अदवंत, भारत काळे यांनी तर पॅनल क्र.२ यावर निवृत्त न्यायाधीश के. के. गायकवाड, एम.एस. कदम, ज्योती सपकाळे यांनी काम पाहिले. प्रबंधक एस.आर.दानी, अधीक्षक अनिल जाधव आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.