शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पंपचालकांच्या संपामुळे वाहनधारकांचे हाल

By admin | Updated: August 12, 2014 02:02 IST

औरंगाबाद : राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांनी सोमवारी पेट्रोलपंप बंद ठेवले.

औरंगाबाद : राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांनी सोमवारी पेट्रोलपंप बंद ठेवले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आज शहरात कंपन्यांचे दोन आणि पोलिसांचा एक, असे तीनच पंप सुरू होते. तेथेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनधारकांना लिटर, दोन लिटर पेट्रोलसाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले. दरम्यान, रस्त्यात मध्येच पेट्रोल संपल्यामुळे अनेकांवर गाड्या ढकलत नेण्याची वेळ आली.पेट्रोलपंप असोसिएशनने राज्यातील सर्व पेट्रोलपंप सोमवारी बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळपासून शहरातील तसेच ग्रामीण भागातील पेट्रोलपंपचालकांनी आपले पंप बंद ठेवले. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. पंपासमोर पेट्रोल नाही, अशा आशयाचे तर काही ठिकाणी आंदोलनाची माहिती देणारे डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे पंपावर जाणाऱ्यांना तसेच माघारी फिरावे लागत होते. तर काही जण पेट्रोलच्या शोधात धावाधाव करीत असताना दिसून आले. पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी पेट्रोलपंप बंद ठेवले होते. मात्र, शहरातील पुंडलिकनगर रोडवरील इस्सार कंपनीचा आणि हर्सूल टी पॉइंट येथील एचपी कंपनीचा, तसेच टीव्ही सेंटर पोलिसांचा पेट्रोलपंप, असे तीन पेट्रोलपंप सुरू होते. शहरातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद असल्यामुळे या तिन्ही पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टीव्ही सेंटर येथील पेट्रोलपंपांवरील रांगा अगदी रस्त्यावर आल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल, डिझेलसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागले. रविवारी रात्रीच केले टँक फुलसोमवारी पेट्रोलपंप बंद राहणार असल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आधीच जाहीर केले होते. रविवारी रात्री व्हॉटस्अप आणि मोबाईलच्या माध्यमातून याची माहिती लोकांमध्ये आदान- प्रदान होत होती. त्यामुळे अनेकांनी रविवारी रात्री पेट्रोलपंपांवर जाऊन गाडीचे टँक फुल करून घेतले होते.