शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे बहरली

By admin | Updated: August 17, 2016 00:55 IST

औरंगाबाद : लगातार सुट्या आल्यामुळे देशभरातील पर्यटकांनी औरंगाबादेतील पर्यटनस्थळ पाहणे पसंत केले. सोमवारी अजिंठा लेणीला सुटी असल्याने पर्यटकांचा ओढा वेरूळ

औरंगाबाद : लगातार सुट्या आल्यामुळे देशभरातील पर्यटकांनी औरंगाबादेतील पर्यटनस्थळ पाहणे पसंत केले. सोमवारी अजिंठा लेणीला सुटी असल्याने पर्यटकांचा ओढा वेरूळ, बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला पाहण्याकडे अधिक होता. यामुळे परिसर गर्दीने बहरून गेला होता. शहरवासीयांनी मिनी महाबळेश्वर असलेल्या म्हैसमाळ येथे जाऊन आनंद लुटला.औरंगाबाद शहरात शनिवारपासूनच देशातील नव्हे तर विदेशातील पर्यटकांनी येणे सुरूकेले होते. रविवार व सोमवार हजारो लोकांपैकी काही जण बीबीका मकबरा, पाणचक्की तसेच देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. याशिवाय म्हैसमाळ, सारोळा या ठिकाणी सहलीचा आनंद लुटला. शहरातील ११ चित्रपटगृहांचे सर्व शो हाऊसफुल होते. तिकीट विक्रीचे नियोजन कोलमडले पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी हजारो पर्यटक शहरात आले होते.तिकीट विक्रीच्या दोनच खिडक्या असल्याने पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे बीबीका मकबरा व वेरूळ प्रशासनाची व्यवस्था कोलमडली होती.विदेशी पर्यटक परत गेले औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा व वेरूळ लेणी हे जागतिक वारसा पाहण्यासाठी ६० पेक्षा अधिक विदेशी पर्यटक शहरात शनिवारी आले होते. सोमवारी अजिंठा लेणी बंद असते यामुळे रविवारी या पर्यटकांनी अजिंठा लेणी पाहिली व सोमवारी सकाळी वेरूळ लेणी गाठली पण येथे विदेशी पर्यटकांसाठी तिकिटाची स्वतंत्र व्यवस्था नव्हती. यामुळे लेणीचे बाहेरून फोटो काढून विदेशी पर्यटक शहरात बीबीका मकबरा पाहण्यासाठी आले येथेही तीच परिस्थिती होती. दुपारी ३ वाजता विमानाने त्यांना दिल्लीला जायचे असल्याने तेथूनही त्यांनी काढता पाय घेतला, असे जसवंतसिंग यांनी सांगितले.