शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

खड्ड्यांमुळे बसमध्येच झाली महिलेची प्रसूती

By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST

सोयगाव : तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रसूती बसमध्येच झाली. सोयगाव-मालेगाव बसमध्ये किन्ही गावाजवळ ही घटना घडली.

सोयगाव : तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रसूती बसमध्येच झाली. सोयगाव-मालेगाव बसमध्ये किन्ही गावाजवळ ही घटना घडली. गर्भवती महिलेवर ओढावलेल्या प्रसंगात बसचे चालक-वाहक यांच्या सावधगिरीने व इतर महिला प्रवाशांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे बाळ व बाळंतीण सुखरूप आहे. सोयगाव तालुक्यातील नांदगाव शिवारात एका वीटभट्टीवर काम करणारी सरलाबाई रोहिदास राठोड (वय ३५) ही गर्भवती महिला चाळीसगावला जाण्यासाठी सोयगाव-मालेगाव बसमध्ये बसली. तिला किन्ही गावाजवळच प्रसूती वेदना सुरू झाल्या. बसचालक नरेश पाटील व वाहक बशीर तडवी यांनी पुरुष प्रवाशांना खाली उतरविले. तोपर्यंत महिला बेशुद्ध पडलेली होती. महिला प्रवाशांना घेऊन बस किन्ही गावात आणली. किन्ही गावच्या सरपंच शोभाबाई शेळके, वंदना फलके, कलाबाई लोखंडे, खाजगी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, उपसरपंच नवनाथ जाधव यांनी तात्काळ प्रसूतीची तयारी केली. किन्ही गावातील महिलांनी त्या महिलेला धीर दिला. महिलेची सुखरूप प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला बसमध्येच जन्म दिला. या बसच्या चालक आणि वाहकांनी केलेल्या सहकार्यामुळे महिला व तिचे मूल सुखरूप वाचले. यामुळे दोन्ही चालक, वाहकाचा गौरव करणार असल्याचे आगार प्रमुख सुभाष भापकर यांनी सांगितले, तर प्रसूतीनंतर महिला व बाळाला किन्ही गावातील ग्रामस्थांनी चांदे (जि.धुळे) येथे रवाना केले.