शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठातांमुळेच पदव्युत्तर प्रवेशाचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठातील टॉपच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रांसह ९० टक्के विभागात अत्यल्प प्रवेश झाले आहेत. महाविद्यालयांची अवस्था तर त्याहून वाईट बनली असल्यामुळे संतापलेल्या कुलगुरूंनी विविध विभागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा प्रवेशाची विदारक अवस्था समोर आली.विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचा गुंता अधिकच वाढला आहे. ढिसाळ नियोजन आणि प्रत्येक दिवशी नवीन नियम काढल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातील एकूण विभागांमध्ये शेवटच्या दिवशी प्रवेशाच्या ५० टक्केही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. मागच्या वर्षी रसायनशास्त्र विभागातील ७० जागांसाठी ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. मात्र यावर्षी विद्यापीठाने लावलेल्या यादीतील केवळ ४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. हीच अवस्था भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सांख्यिकीयशास्त्राची बनली आहे. सामाजिक शास्त्रातील काही विभागांमध्ये तर दोन आकडीही प्रवेश झाले नसल्याचे पाहणीत समोर आले. या गोंधळमुळे कुलगुरूंनी थेट रसायनशास्त्र, संगणशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकीय, पर्यावरण आदी विभागांना भेटी दिल्या. या पाहणीत मोठा सावळा गोंधळ समोर आला. रसायनशास्त्र विभागात ७० जागा असताना केवळ ६० विद्यार्थ्यांची यादी पाठविली. मात्र स. भु. विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे ६० जागा असताना ७५ विद्यार्थ्यांची यादी पाठविली, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. स्पॉट अ‍ॅडमिशनसाठी ठेवलेल्या अर्जातही मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यावर अनेक प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता सर्व प्रक्रिया एसी हॉलमध्ये बसून अधिष्ठातांनी राबविली. या अधिष्ठातांच्या मनमानीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी कुलगुरूंकडे केली. त्यावर कुलगुरूंनीही अधिष्ठातांच्या हलगर्जी आणि वास्तववादी भूमिकेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचे मान्य केले. प्रवेश प्रक्रिया पार पाडताच सर्व अधिष्ठातांची उचलबांगडी करण्याचे सूतोवाचही कुलगुरूंनी केले.शेवटपर्यंतही गुणवत्ता यादी नाहीचपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दोन फेºयाची प्रवेश प्रक्रिया संपली. तरीही विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केल्या आहेत. अनेकांना सीईटीमध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्या विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळाले. यात विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही फेºयांमध्ये प्रवेश मिळालेला नाही.