शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

हणमंत गायकवाड , लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून

हणमंत गायकवाड , लातूरस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबर अनेक सुविधांचाही अभाव आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या परिसरात शोभेच्या वस्तुगत पार्किंग केलेली आहे़ शिवाय, मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे़ लातूर शहरापासून विद्यापीठ उपकेंद्राचे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना लातूर शहरातून उपकेंद्रात जाण्यासाठी विद्यापीठाने एक बस दिली आहे़ काही दिवस या बसमधूनच विद्यार्थी उपकेंद्रात जात होते़ मात्र गेल्या एप्रिल महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये पार्किंग केलेली आहे़ लातूर बसस्थानक, गांधी चौक, रेणापूर नाका, पाण्याची टाकी, शिवाजी चौक व राजीव गांधी चौकात या बसचा थांबा होता़ या थांब्यावरुन विद्यार्थी घेतल्यानंतर बस उपकेंद्रात जात असे़ परंतू आता या बसला चालकच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे उपकेंद्रात जावे लागत आहे़ साध्या चालकाचा प्रश्न विद्यापीठाने गांभिर्याने घेतला नाही़ परिणामी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ सध्या उपकेंद्राच्या तीन संकुलात एमबीएच्या प्रथम वर्गात ३० व द्वितीय वर्षात २०, एम़ए़अर्थशास्त्राच्या प्रथम वर्षात २३ व द्वितीय वर्षात १३, एम़ए़ समाजशास्त्राच्या प्रथम व द्वितीय वर्षाला प्रत्येकी ८, एम़एस्सी़ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात २५ व द्वितीय वर्षात १४, एम़एस्सी़बायो़ प्रथम वर्षात १ व द्वितीय वर्षात २, समाजकार्य प्रथम ३६ व द्वितीय २६ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ प्रथम वर्षाचा आकडा अधिक असून, द्वितीय वर्षाचा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमाला कमी झाला आहे़ केवळ उपकेंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संस्थेतून काढता पाय घेतला आहे़लातूर शहराची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून देशात झाली आहे़ त्यामुळेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला उपकेंद्र दिले़ लातूर ते नांदेडचे अंतर दीडशे किलोमिटरच्या जवळपास आहे़ वेळ व पैसा तसेच एवढे अंतर काठून किरकोळ कामासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्याची गरज पडू नये म्हणून उपकेंद्राची निर्मिती त्यांनी केली़ परंतू हा उद्देश प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सफल होताना दिसत नाही़ बसला साधा चालक मिळू नये हे उपकेंद्राचे मोठे दुर्दैव आहे़