शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 24, 2014 23:52 IST

परभणी: पोळा या सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.

परभणी: शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण असलेल्या पोळा या सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतात अन्न-धान्य पिकले नाही आणि पाण्याचीही टंचाई असल्याने हा सण उसणं-अवसान आणून साजरा करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाने मोठा ताण दिला. पावसाळ्यातील दोन महिने कोरडेठाक गेले. त्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने रबी हंगाम धुवून गेला. त्यामुळे रबी आणि खरीप या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अशा संकटकालीन परिस्थितीत पोळा हा सण येऊन ठेपला आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या पशूधनाच्या कष्टातून उतराई होण्यासाठी बैलांची सजावट करुन मनोभावे पूजा केली जाते. परंतु, यावर्षी दुष्काळामुळे हा सण उत्साहात साजरा करणे कठीण जात आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना पानवठ्यावर नेऊन स्रान घातले जाते. तुप, लोण्याने खांदेमळणी केली जाते. यावर्षी जलसाठे आटले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही तर बैलांच्या स्न्नानाचे काय? असा प्रश्न आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यानुसार शेतकऱ्यांनी रविवारी बैलांची खांदेमळणी करुन घेतली. (प्रतिनिधी)पोळा सणाच्या निमित्ताने परभणी शहरातील बाजारपेठेत दरवर्षी शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होते. परंतु, यावर्षी बाजारपेठेत शेतकऱ्यांची संख्या अल्पशी होती. झुल, कासरे, सुत, घंटा, गोंडे, वेसण, मोरक्या आदी साहित्य पोळ्यापूर्वी विक्रीला येते. परंतु, खरेदीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद दिसला नाही. शेतकरी हैराणताडकळस- पोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांत अनुत्साह आहे. दरवर्षी पोळ्याला बैलांसाठी सजावटीचे साहित्य खरेदी केले जाते. परंतु, यावर्षी पाऊस झाला नसल्याने पिके जेमतेम आहेत. सोयाबीन, कापूस जमिनीतच आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. पोळ्याच्या सणाला मुगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येते. परंतु, यावर्षी कुठलेही धान्य आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला.येलदरी व परिसरात पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरल्याचे दिसत आहे. सोमवारी पोळा सण असून त्यापूर्वी बैलांना सजावटीसाठी उबलब्ध होणारा साज खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसली नाही. झुल, घागरमाळ, विविध हार, घुंगरे, गोंडे आदींची यानिमित्ताने खरेदी होते. परंतु, यावर्षी या वस्तू खरेदी न करता साध्या पद्धतीने पोळा साजरा होणार असल्याचे दिसते. वाढलेले भाव आणि आर्थिक अडचण लक्षात घेता आठवडी बाजारातून शेतकरी रिकाम्या हातानेच परतल्याचे दिसून आले. दुष्काळ आणि रोगाचा प्रादुर्भाव४गतवर्षी लाल्याने व यंदा दुष्काळाने शेतकऱ्यांची वाहताहत केली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. ४अशा प्रतिकुल परिस्थितीवर बैलांचा पोळा सण कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बैलांना धुण्यासाठीही उरले नाही पाणी...दैठणा- पावसाळ्यातील अडीच महिने लोटले तरी नदी-नाले कोरडे आहेत. दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पोळ्याला बैल कुठे धुवावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण आहे. या सणाच्या दिवशी खरीप हंगामातील मूग, उडीद हे नगदी पीक तयार होऊन घरात येते. त्यामुळे महिनाभरापासूनच पोळ्याची तयारी सुरु असते. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची पूजा करुन आज आवतन् उद्या जेवायला या, असे निमंत्रण दिले जाते. पोळ्याच्या दिवशी सकाळीच उठून बैलांना चारा दिला जातो. जवळच्या नदीला चांगल्या प्रकारे धुवून दुपारी वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. हनुमान मंदिरास प्रदर्शना घालून पूजा करुन गायी-बैलाचे लग्न लावले जाते. एक महिन्यापासून धरलेल्या उपवासाची सांगता होते. परंतु, यावर्षी दुबार पेरणी करुनही शेतात पिकले नाही. पिके सुकू लागली आहेत. बैलांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.