शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाअभावी बिबट्यांचे आगमन लांबले

By admin | Updated: January 15, 2016 00:16 IST

औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आनंदवनातून येणाऱ्या बिबट्यांच्या जोडीचे आगमन वाहनाअभावी लांबले आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच मनपाला आनंदवनातील बिबट्यांची जोडी देण्यास मंजुरी दिली

औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आनंदवनातून येणाऱ्या बिबट्यांच्या जोडीचे आगमन वाहनाअभावी लांबले आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच मनपाला आनंदवनातील बिबट्यांची जोडी देण्यास मंजुरी दिली. मात्र, त्यांना आणण्यासाठी मनपाला वाहन मिळेनासे झाले आहे. मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून वाहनाची व्यवस्था केली जात नसल्यामुळेच बिबटे येण्यास उशीर लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.मनपाच्या प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती यांसह सुमारे ५० पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आहेत. बिबट्यांची संख्या नगण्य नसल्यामुळे बिबट्यांची एक जोडी मिळावी यासाठी मनपा प्रशासनाने बऱ्याच दिवसांपासून वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार दोन-तीन महिन्यांपूर्वीच वन विभागाने आनंदवनातून मनपाला दोन बिबटे देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार आनंदवन प्रशासनानेही मनपाला बिबटे घेऊन जाण्याची सूचना केली; परंतु वाहनाची सोय होत नसल्यामुळे या बिबट्यांचे आगमन लांबले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राणिसंग्रहालय प्रशासनाने यांत्रिकी विभागाने बिबटे आणण्यासाठी गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदविलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून गाडी मिळत नसल्यामुळे बिबटे आणण्यास उशीर होत आहे. आनंदवनात बिबट्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वन विभागाने तेथील दोन बिबटे मनपाला देण्यास मंजुरी दिलेली आहे. दोन वाघ हलविणार, दोन बिबटे येणारमनपाच्या प्राणिसंग्रहालयातून लवकरच दोन वाघ मध्यप्रदेशात हलविले जाणार आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील दोन वाघ मध्यप्रदेशात हलविण्याची सूचना सेंट्रल झू आॅथॉरिटीने केली होती. त्यानुसार मनपाच्या सर्वसाधारण सभेने आठवडाभरापूर्वीच तसा ठराव मंजूर केला. त्यानुसार लवकरच वाघांची एक जोडी मुकूंदपूर येथे सुरू होणाऱ्या नवीन प्राणिसंग्रहालयात दिली जाणार आहे. ही वाघांची जोडी जाण्याबरोबरच आनंदवनातून दोन बिबटे येथे येणार आहेत.