शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: August 13, 2014 00:51 IST

जालना : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून

जालना : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून अशीच स्थिती राहिल्यास जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आगामी काळात निर्माण होणार आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.२०१२ च्या भीषण दुष्काळानंतर २०१३ मध्ये पर्जन्यमान चांगले राहिल्याने जिल्हावासियांना विशेषत: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी कोणते पीक घ्यायचे, याचा विचार करून बळीराजा मृगनक्षत्राची वाट पाहत होता. मात्र मृग गेले, आर्द्राही गेले, तरीही पाऊस झाला नाही. तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हलक्या स्वरूपाच्या का होईना दोन-तीन वेळा झालेल्या पावसामुळे व आता चांगला पाऊस होईल, या आशेवर १५ जुलै २०१४ पर्यंत जिल्ह्यात १ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. १५ ते ३१ जुलै या काळातही एक-दोन हलक्या स्वरूपाच्या पावसाने पेरणीचे प्रमाण सव्वातीन लाख हेक्टरवर गेले. ६ व ७ आॅगस्ट या काळात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सर्वसाधारणपणे ४ ते २२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद वेगवेगळ्या भागात झाली. या पावसामुळे १२ आॅगस्टपर्यंत ५ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिके २० ते २५ दिवसांच्या काळातील आहेत. भीज पाऊस झाला नाही,अशा ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पिकांना खत दिले. परंतु जवळपास ठिकाणी पिकांची वाढ खुंटलेली आहे. सोयाबीनची पाने सुकलेली आहेत. कपाशी तग धरून असली तरी पावसाची गरज आहे. मात्र गेल्या सलग चार दिवसांपासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने उकाडा जाणवत आहे. या उन्हाचाही आतापर्यंत आलेल्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र त्याचबरोबर सोयाबीनचा पेराही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केला. सोयाबीनचे बी बाजारात लवकर मिळत नसल्याने घरच्या बियाणाचीच लागवड करण्यात आली. परंतु पावसाअभावी काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली. आगामी दोन-तीन दिवसांत पावसाची गरज असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. कपाशी तग धरणारे पीक आहे. परंतु अन्य पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे.जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी ५ लाख ६१ हजार ३६० हेक्टर एवढे आहे. कपाशीची पेरणी सुमारे सव्वादोन लाख हेक्टरमध्ये झाली. सोयाबीनची पेरणी एक लाखापेक्षा अधिक हेक्टरमध्ये झाली. ४मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार १०० हेक्टर आहे. त्याचीही पेरणी ९० टक्के झाली. यासह ज्वारी, बाजरी, तूर भुईमूग, सूर्यफूल इत्यादी पिकांची पेरणी केली. मात्र पावसाअभावी या पिकांची वाढ खुंटलेली आहे. या काळात दीड फुटांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.