शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख विद्यार्थ्यांच्या अंगावर ड्रेस !

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

भालचंद्र येडवे , लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सव्वालाख पात्र लाभार्थ्यांच्या अंगावर सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे ड्रेस शिक्षण विभागामार्फत वितरित करण्यात आल्याने

भालचंद्र येडवे , लातूरस्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सव्वालाख पात्र लाभार्थ्यांच्या अंगावर सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे ड्रेस शिक्षण विभागामार्फत वितरित करण्यात आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी पालकांत उत्साहाचे वातावरण आहे़ जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिली ते आठवी वर्गात शिकत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील १ लाख १६ हजार ४७१ मुलांना सुमारे २ कोटी २४ लाख रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता़ सदर निधी तालुकास्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात आला़ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मोफत गणवेश वितरण करण्यात आले़ जिल्ह्यातील शंभर टक्के होतकरू विद्यार्थ्यांना पहिला संचाचा लाभ मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे़ पाठ्यपुस्तके वाटप़़़यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या ३ कोटी ७५ लाख ५५१ पात्र लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आले आहेत़ गणवेशासोबतच विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पुस्तके पडल्याचा आनंदही द्विगुणित होत आहे़ बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात ५० वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत़ या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्गखोल्यांचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात येणार आहे़ पुनर्रचित अभ्यासक्रम बदलानुसार इयत्ता तिसरी व चौथीसाठी शिकविणाऱ्या ५ हजार २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ चालू शैक्षणिक वर्षामध्ये वाचन, लेखन व गणित कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंत गुणवत्ता संवर्धनासाठी विशेष प्रशिक्षणाचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार त्रिस्तरीय पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे़ सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्णातील उदगीर तालुक्यात १०० शाळांमध्ये पहिली ते चौथीसाठी प्रायोगिक तत्वावर वाचन, लेखन व गणित कार्यक्रम प्रभावीपणे घेण्यात आला होता़ याची यशस्वीता पाहता सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्णातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच शाळांमधून हा उपक्रम घेण्यात येणार आहे़ राज्यभरात कौतूक़़़़़४जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांच्या संकल्पनेतून व जि़प़चे शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्णात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे राज्यभरात दखल घेण्यात आली आहे़