शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

पानटपरी चालकाच्या मुलाचे ‘डॉक्टर’ बनण्याचे स्वप्न

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

कळमनुरी : केवळ एक एकर शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालविणारे कैलासराव रोडगे यांचा मुलगा वैभव याने दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण

कळमनुरी : केवळ एक एकर शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालविणारे कैलासराव रोडगे यांचा मुलगा वैभव याने दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण संपादन करून कळमनुरी येथील महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कळमनुरी येथील कैलासराव रोडगे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा वैभव दहावीत तर मुलगी सातवीत शिकत असल्याने त्यांचा शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी घर कळमनुरीत ठेवून ते औंढा नागनाथ येथे पानटपरीसह कोड्रींक्स विक्रीचा व्यवसाय करतात. आठवीत असल्यापासून वैभवने भाषा विषय म्हणून संस्कृतची केलेली निवड आज त्याच्या यशाचा आलेख उंचावण्यास महत्वाची ठरली आहे. दहावीच्या परिक्षेत वैभव रोडगे याला संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयांमध्ये सरासरी ९५ गुण त्याने संपादन केले आहेत. ५०० पैकी ४८१ गुण संपादन करून त्याने महात्मा फुले विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.आठवी-नववीमध्येही त्याने संस्कृतमध्ये ९९ गुण घेतले होते. त्यामुळे दहावीच्या अभ्यासाबाबत त्याला आत्मविश्वास होता. सराव परिक्षेत ९७ टक्के गुण घेतल्यामुळे वार्षिक परिक्षेत ९५ टक्केपेक्षा अधिक गुण निश्चित मिळवेन असे त्याने आधीच सांगितले होते, असे कैलासराव रोडगे म्हणाले. कळमनुरी येथील रामभाऊ कोळपे यांच्या अभ्यासिकेत स्टडी सर्कलच्या माध्यमातून सर्व विषयांची तयारी करून घेण्यात आली. तसेच शंकरराव सातव महाविद्यालयातील प्रा. एम. एस. रोडगे या काकानेही इंग्रजी विषयाची भीती दूर केल्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, असे वैभव सांगतो. याशिवाय शाळेतील शिक्षक पी. बी. जगताप, जे. जे. गांगजी, बी. के. राठोड यांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले. घरी दररोज चार ते पाच तास अभ्यास करून हे घवघवीत यश मिळवलेला वैभव कौतुकाचा मानकरी ठरत आहे.अभ्यासामध्ये अग्रेसर असलेल्या वैभवला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. तसेच जुने चलनी नाणे-नोटा गोळा करण्याचा छंदही त्याने जोपासला आहे. आतापर्यंत २० देशांमधील १५० चलनी नाणे तसेच नेपाळ, अमेरिकासारख्या देशांच्या २० नोटाही त्याच्याकडे संग्रही आहेत. अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी छंद उपयोगी ठरतात असे सांगणारा वैभव नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणार आहे. बारावीला चांगले गुण घेऊन पुढे डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तुम्हाला मुलाचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च झेपेल का? असा प्रश्न विचारताच कैलारावराव रोडगे म्हणाले, ‘आमच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. गरज पडल्यास ती जमीन विकून मुलाला डॉक्टर बनवू.’ (वार्ताहर)यशासाठी...दररोज चार ते पाच तास केला अभ्यास.इंग्रजीची भीती दूर केल्यामुळे मिळविता आले यश.अभ्यासिकेमध्ये स्टडी सर्कलच्या माध्यमातून करून घेण्यात आली सर्व विषयांची शिक्षकांकडून तयारी. सराव परिक्षेत ९७ टक्के गुण मिळविल्याने अधिक गुण मिळविण्याचा विश्वास.