शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासाचे स्वप्न ‘लोकमत’ने केले पूर्ण

By admin | Updated: June 23, 2016 01:30 IST

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न पाहणारे अनेक जण असतात. आकाशात उडणारे विमान अशा स्वप्नाळू

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न पाहणारे अनेक जण असतात. आकाशात उडणारे विमान अशा स्वप्नाळू व्यक्तींच्या मनाला प्रत्येक वेळी नवी उभारी देऊन जाते. असेच विमान प्रवासाचे स्वप्न पाहत होता तेजस अशोक वाघ हा विद्यार्थी. त्याचे विमान प्रवासाचे स्वप्न आश्चर्यकारक रीतीने पूर्ण झाले आणि तेही ‘लोक मत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेमुळे. या स्पर्धेच्या सोडतीचा (लकी ड्रॉ) निकाल नुकताच लागला असून यामध्ये गोदावरी पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी तेजस वाघ हा हवाई सफरीच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तो लवकरच मुंबई- दिल्ली- मुंबई असा विमानप्रवास करणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने शाळेत जाऊन या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ‘लोकमत’च्या वितरण विभागाचे व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, प्रतिनिधी प्रशांत आरक, गंगाधर पठाडे, प्राचार्या शुभांगी काळे, उपमुख्याध्यापक दिलीप सूर्यवंशी, पर्यवेक्षिका वैशाली सोनवणे, बबन माळी आदींच्या हस्ते तेजसचा सत्कार करण्यात आला. तेजसचे आई-वडील नंदा व अशोक वाघ यांची उपस्थिती होती. शिक्षक संतोष गोसावी, विजय रानभरे, देविदास कोकदे यांनी तेजसला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ने सुरू केलेली संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून घराघरांमध्ये तसेच शाळा-शाळांमध्ये संस्काराचे बीजारोपण करण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘लोकमत’ करत आहे, असे मत प्राचार्या शुभांगी काळे यांनी व्यक्त केले. आई-वडील अत्यानंदाने भावनाविवश...आपल्या मुलाचे विमान प्रवासाचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे बघून तेजसचे आई-वडील अत्यानंदाने अत्यंत भावूक झाले होते. त्याची आई म्हणाली की, माझ्या मुलाचे हे स्वप्न फ क्त आणि फक्त ‘लोकमत’मुळेच पूर्ण होत आहे. त्यांनी ‘लोकमत’चे मनापासून आभार मानले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. मी दुसरीत असल्यापासून या स्पर्धेत नियमितपणे भाग घेत होते. यंदा मी ही स्पर्धा जिंकेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. माझे हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. विमान प्रवासासाठी शुभेच्छा देऊन ‘लोकमत’ने माझा गौरव केला. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. - तेजस वाघ, ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचा विजेता