शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षणासाठी धरणे आंदोलन

By admin | Updated: October 19, 2016 01:08 IST

औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने मुस्लिम समाजाला त्वरित न्याय न दिल्यास आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.जमियत-ए-उलेमा हिंदने आठ दिवसांपूर्वीच मुस्लिम आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. शहरात जनजागृतीसाठी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले. या आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. धरणे आंदोलनात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत मार्गदर्शनही केले. एका शिष्टमंडळाद्वारे विभागीय आयुक्तांना निवेदनही सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केले की, मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण द्यावे, अशी शिफारस सच्चर आणि रंगनाथ मिश्रा समितीने केली आहे. राज्य शासनाने नेमलेल्या महेमूद-ऊर-रहेमान समितीनेही आरक्षणाचे समर्थन केलेले आहे. यापूर्वी शासनाने मुस्लिम समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. यानंतरही शासन याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. शासनाची ही भूमिका अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासनाने त्वरित आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनात जमियत-ए-उलेमा हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी, शहराध्यक्ष खलील खान, उब्दुल रऊफ, मौलाना अब्दुल रशीद मदनी, मौलाना मुस्तकीम, मौलाना शेख अब्दुल खुद्दूस मिल्ली, मौलाना अब्दुल सत्तार, मौलाना अब्दुल रहीम मिल्ली, हाफीज अब्दुल्लाह, मौलाना मोहंमद युसूफ, हाफीज शेख सिकंदर, नगरसेवक अब्दुल नवीद, अय्युब खान, जमीर कादरी, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, मीर हिदायत अली, रमजानी खान, खालेद पठाण, मश्शू , फिरोज खान, मौलाना अहमद खान नदवी, मुफ्ती जाकीर कास्मी आदींची प्रमुख उपस्थिती होती.