विजय सरवदे ल्ल औरंगाबाद‘दो बुंद जिंदगी के’... पोलिओ लसीकरणासंबंधी अमिताभ बच्चनची ही जाहिरात प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करून गेली खरी; पण पोलिओ निर्मूलनासाठी बालकांना दिल्या जाणाऱ्या डोसमधील एक घटक घातक ठरल्याचा राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळेचा धक्कादायक निष्कर्ष समोर आल्यामुळे अख्खी आरोग्य यंत्रणाच अवाक् झाली आहे. दरम्यान, १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी राज्यभरात राबविण्यात येणारी पोलिओ लसीकरणाची मोहीम ही अखेरची असेल. त्यानंतरच्या लसीकरण मोहिमेत मात्र, सध्याच्या डोसमधील ‘पी-२’ हा एक घटक कायमचा हद्दपार झालेला असेल. जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी या घटनेस दुजोरा दिलेला आहे. दरम्यान, यापुढील लस ही पोलिओ निर्मूलनासाठी अत्यंत प्रभावी असून, बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा इंजेक्शनद्वारे डोस देण्याची मोहीम राबविली जाणार आहे. ० ते ५ वयोगटातील बालकांना ब्रूनहाइड, लान्सिंग व लिआॅन या विषाणूंमुळे पोलिओ होतो. पोलिओमुळे बालकांना कायमचे अपंगत्व येते. १९९५ पासून राज्यांमध्ये दरवर्षी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. गेल्या वर्षी १८ जानेवारी आणि २२ फेब्रुवारी रोजी राज्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. यंदा १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी पोलिओ लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलिओच्या लसीमध्ये प्रामुख्याने पी-१, पी-२ आणि पी-३ हे रोगप्रतिबंधात्मक तीन घटक आहेत. यापैकी सध्याच्या लसीतील ‘पी-२’ हा घटक पोलिओ होण्यास कारणीभूत ठरल्याचा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय प्रयोगशाळेने दिला. त्यानंतर राज्याचा आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने सध्या दिल्या जाणाऱ्या डोसमधील ‘पी-२’ हा घटक कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. 1सध्याच्या लसीमध्ये ‘पी-२’ हा घातक घटक असला तरी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मोहिमेत प्रत्येकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना ही लस देणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले. 2बाालकांना पोलिओपासून मुक्ती मिळावी म्हणून वर्षातून दोन वेळा हा डोस पाजला जायचा. बालकांच्या शरीराला या डोसची सवय लागलेली आहे. त्यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ही लस पाजली जाईल. त्यानंतर एप्रिलमध्ये मात्र, बालकांना इंजेक्शनद्वारे लस टोचली जाईल. ज्यामुळे बालकांमध्ये पोलिओ प्रतिकारक शक्ती वाढेल. पुढील वर्षापासून मग पोलिओ निर्मूलनासाठी ‘पी-१ आणि पी-३’ हे दोनच घटक असलेला डोस पाजला जाईल व इंजेक्शनच्या माध्यमातून एक लस टोचली जाईल, असे खतगावकर यांनी सांगितले.पोलिओ निर्मूलनासाठी मोठा गाजावाजा करून वर्षातून दोन वेळा लसीकरणाची मोहीम राबविली जाते. ४यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीदेखील २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कान्हापूर येथील अकरा महिन्यांच्या मुलाला पोलिओ असल्याचे निष्पन्न झाले होते. ४पोलिओ डोसमधील ‘पी-२’ नावाचा घटकच यास कारणीभूत ठरल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी चिपळूण तालुक्यातही पोलिओसदृश बालक आढळून आला होता. आरोग्य विभागाने त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळेत पोलिओच्या लसीचे पृथक्करण केले तेव्हा सत्य समोर आले.
डोसमधील घटक घातक
By admin | Updated: January 5, 2016 00:19 IST