शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच्या मुलीचे फोटो काढू नका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुलीचे फोटो काढू नयेत, अशी विनंती फोटोग्राफरला केली आहे. अनुष्का आणि ...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुलीचे फोटो काढू नयेत, अशी विनंती फोटोग्राफरला केली आहे. अनुष्का आणि विराट कोहलीने फोटोग्राफर्सला एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो फोटोग्राफर्सने काढू नयेत असे म्हटले होते. ‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने, योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करू असे म्हटले आहे.

रोनित व रिचाच्या ‘कँडी’ची उत्सुकता

रोनित रॉय व रिचा चड्ढाची ‘कँडी’ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत बोलताना रोनित म्‍हणाला, ‘मला प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने मी खूपच नशीबवान आहे.’ तर रिचा म्‍हणाली, ‘ही थ्रिलर/ सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्‍या भूमिका साकारण्‍याकडे मी नेहमीच आकर्षून गेले आहे आणि ही अगदी परिपूर्ण संधी होती.’ सिरीजचे दिग्‍दर्शन आशिष आर. शुक्‍ला यांनी केले आहे.

प्रिया वारियरचे नवे गाणे व्हायरल

फक्त आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्याने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर आहे. ‘ओरू अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या प्रियाचे नवे गाणे प्रदर्शित झाले असून ते व्हायरल झाले आहे. हे एक तेलुगू गाणे असून मकरसंक्रांतीच्या दिवशी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे नाव ‘लाडी लाडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.