शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रुग्णालयास बरमदे देणार सोनोग्राफी मशीन दान

By admin | Updated: June 12, 2014 01:37 IST

सितम सोनवणे , लातूर शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात तंत्रज्ञ असतानाही केवळ सोनोग्राफी मशीन नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे़

सितम सोनवणे , लातूरशहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात तंत्रज्ञ असतानाही केवळ सोनोग्राफी मशीन नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे या महिलांना खाजगी रुग्णालयात तपासणी करावी लागत आहे़ यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच लातुरातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांनी सोनोग्राफी मशीन दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे़ ही मशीन रुग्णालय प्रशासनाने स्वीकारल्यास गरोदर महिलांना बसणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर होणार आहे़ सुरक्षित बाळंतपण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ त्यामुळे त्यांचा सामान्य कुटुंबातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शहरातील लेबर कॉलनी येथे स्त्री रुग्णालय आहे़ या परिसरातील गरोदरमातांना शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय दूर होत असल्याने बहुतांशी गरोदर महिला आपल्या कॉलनीतील रुग्णालयात उपचारासाठी नेहमी ये- जा करीत असतात़ प्रशासनाच्या वतीने या रुग्णांना अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी येथील स्त्री रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सोनोग्राफी मशीन उपलब्ध नाही़ परिणामी, तपासणीसाठी आलेल्या महिलांना नजीकच्या खाजगी सेंटरचा अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आधार घ्यावा लागत असे़ वास्तविक पहाता अनेक महिलांची पायी जाण्याची स्थितीही नसते़ परंतु, तपासणी मशीनच उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे गरोदर महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे़यासंदर्भात चौकशी केली असता प्रशासनाकडून कराराअभावी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे लोकमतमधून करारात अडकले सोनोग्राफी यंत्र या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले़ या वृत्तामुळे गरोदर महिलांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची होणारी अडचण जाणून शहरातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ़ कल्याण बरमदे यांनी या स्त्री रुग्णालयास सोनोग्राफी मशीन दान देण्याचा मानस व्यक्त केला आहे़ त्यामुळे आता लवकरच स्त्री रुग्णालयास सोनोग्राफी मशीन उपलब्ध होणार आहे़ही मशीन रुग्णालयाच्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासही बुधवारपासून प्रारंभ झाला आहे़ विशेष म्हणजे या सोनोग्राफी मशिनची वर्षभराची दुरुस्ती करण्याची जबाबदारी डॉ़ बरमदे यांनी स्विकारली आहे़ लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे़ काही तांत्रिक अडचणी येत आहे़ सध्याच्या स्थितीत मशीन नसल्याने गरोदर महिलांची अडचण होत आहे़ डॉ़ कल्याण बरमदे यांनी सोनोग्राफी मशिन देण्याचे सांगितले आहे़ या मशिन संदर्भातील माहिती, रितसर प्रस्ताव डॉ़ बरमदे यांनी स्त्री रुग्णालयाकडे सादर करावा़ त्याची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ बी़ एस़ कोरे यांनी सांगितले़