शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST

औरंगाबाद : वर्गमैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत काढलेले ...

औरंगाबाद : वर्गमैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत काढलेले आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी पीडित तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अजहर अश्फाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असून त्यास ओसामा खान व हमजा पठाण यांनी मदत केली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित तरुणीचे बीडीएसचे शिक्षण झाले असून, ती एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करते. वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची तिचा नातेवाईक अजहर शेख याच्यासह त्याची आई व बहिणीची ओळख करून दिली. तेव्हा त्याने एका विमान कंपनीत मुंबई येथे नोकरीला असल्याचे सांगितले. त्याने पहिल्याच भेटी तू आवडत असून आपण लग्न करू, अशी गळ घातली. लवकरच सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लागणार असून, आपण जेद्दा येथे स्थायिक होऊ, असेही आमिष दाखविले. यातून त्यांची मैत्री वाढत गेली.

त्याने २१ नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादेत एका हॉटेलवर भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार केला. त्यावेळी खोलीत तिचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने ९, १० जानेवारी, १ व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर तिच्या आई - वडिलांच्या मोबाइलवर तिची छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून बलात्कार, खंडणीसह इतर गुन्हे दाखल केले आहेत.