औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविण्यात येते. मागील काही वर्षांपासून महाविद्यालयात तब्बल ७१ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.एकीकडे राज्यात आरोग्याच्या सोयी-सुविधा मजबूत करण्यावर शासन भर देत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. दुसरीकडे जिथे डॉक्टर घडविण्याचे काम करण्यात येते तेथील पदे वर्षानुवर्षे रिक्त ठेवण्यात येतात. याला शासनाची कोणती ‘नीती’ म्हणावी, असा प्रश्न महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे. महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सर्वाधिक ५३, तर रुग्णसेवेसाठी असलेल्या १८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मनोविकृतीशास्त्र, हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्साशास्त्र, न्युरोसर्जरी विभाग चक्क कोमात गेले आहेत. रुग्णालयाच्या आस्थापनेवरही वैद्यकीय प्राध्यापकांची ६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी मनोविकृतीशास्त्र, हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्साशास्त्र विभाग आणि न्युरोसर्जरीच्या प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. मनोविकृतीशास्त्र विभागातील मुंबईतील डॉ. हरदास यांची २०११ मध्ये बदली झाली. डॉ. हरदास रुजू झाले आणि नंतर गायब झाले. हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्साशास्त्र विभागाला स्थापनेपासून आजपर्यंत एकही प्राध्यापक मिळाला नाही. न्युरोसर्जरी विभागाचीही हीच अवस्था आहे. मनोचिकित्साशास्त्र विभागाचा डोलारा केवळ एकच सहायक प्राध्यापक सांभाळत आहेत. तेथील पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद पडलेला आहे. उरोशल्यचिकित्साशास्त्र विभागातील बायपाससारख्या सर्जरीही सर्जनअभावी बंद पडलेल्या आहेत. या विभागात मानद प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मानद प्रा. डॉ. मनोहर काळबांडे यांच्या नियुक्तीचा कालावधी संपल्यापासून ते घाटीत येत नाहीत. याशिवाय शासकीय कॅन्सर रुग्णालयातील किरणोपचार विभागातील प्राध्यापक पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मात्र, अद्याप या विभागासाठी पदे मंजूर करण्यात आली नाहीत. एवढेच नव्हे विविध विभागांतील तंत्रज्ञांची पदेही रिक्त असल्याने रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत आहे. धक्कादायक बाब1,177खाटा रुग्णालयासाठी150विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्ष (प्रवेश क्षमता)126पी.जी. विद्यार्थी संख्या08प्राध्यापकांच्या जागा रिक्त39सहयोगी प्राध्यापक24सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त
डॉक्टर विद्यार्थ्यांना मास्तर मिळेनात!
By admin | Updated: June 22, 2014 00:52 IST