शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

बळीराजाच्या संकटाचा फेरा सुटेना

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

लातूर : जिल्ह्यात महिनाभराच्या विलंबाने वरूणराजा बरसला़ त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली़

लातूर : जिल्ह्यात महिनाभराच्या विलंबाने वरूणराजा बरसला़ त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली़ पेरणी पूर्ण करण्याच्या मानसिकतेत असलेल्या शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांच्या बियाणांवर भर दिला़ परंतु, याच काही कंपन्यांच्या बियाणांनी शेतकऱ्यांना दगा दिला़ पावसाने उघाड दिल्याने वाऱ्यासारखे मन झालेल्या शेतकऱ्यांचे आता तर कंबरडेच मोडले आहे़ दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांवर ओढवले आहे़ त्यामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला असून, या हंगामात पेरणी करायची की, नाही ? केल्यास पुन्हा दगाफटका होईल का ? अशी भीती व्यक्त होत आहे़ जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असली तरी यातील १८३ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारींचा पाऊसच पाडला आहे़ पंचनामे करून भरपाई द्यावी़ तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत़ सोयाबीन बियाणाने केला घातव्ही़एसक़ुलकर्णी ल्ल उदगीरपुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या़ मात्र, ७ जुलैैनंतर तालुक्यात पाऊसच नसल्याने आणि सोयाबीनच्या कंपनीच्या बियाणाने दगा दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले ती पावसाअभावी वाळून गेली आहेत़उदगीर तालुक्यात मृग व आर्द्रा ही पावसाची दोन नक्षत्रे कोरडीठाक गेली़ पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभी ७ जुलैै रोजी तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या करण्यास सुरूवात केली़ आतापर्यंत तालुक्यात ८३ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे़ पेरणीनंतर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही़ खरीपाचे पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे़ नळगीर, नागलगाव परीसरात आत्तापर्यंत ४० टक्के कर अन्य महसूल मंडळ विभागात ८० टक्के खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत़ सोयाबीनचे बोगस बियाणे असल्यामुळे ओलावा असूनही या बियाणाची उगवण झाली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहेत़ तालुक्यातील २३ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत़ मृग नक्षत्राचे वाहन हत्ती होते़ आर्दा नक्षत्राचे मोर तर पुनर्वसू नक्षत्राचे वाहन गाढव आहे़ २० जुलै रोजी पुष्प नक्षत्राचे वाहन मेंढा आहे़ हत्ती, मोराने शेतकऱ्यांना दगा दिला गाढवाने दिले जीवदान, आता मेंढा शेतकऱ्यांना तारणार की? या आशेवर तालुक्यातील शेतकरी विसंबून आहेत़ तालुक्यात आत्तापर्यंत उदगीर येथे १२९ मि़मी़ (३५७ मि़मी़), वाढवणा ११४ मि़मी़ (३६७ मि़मी़), हेर १२९ मि़मी़ (३७० मि़मी़), देवर्जन १७१ मि़मी़(२५५ मि़मी़), मोघा १३९ मि़मी़ (३०९ मि़मी़), नळगे ७१ मि़मी़ (३०० मि़मी़), नागलगाव ९५ मि़मी़(३०४ मि़मी़) असा झाला आहे़१५ हजार हेक्टरला बसला फटकाविठ्ठल कटके ल्ल रेणापूरयंदा उशिरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु, तालुक्यातील जवळपास १५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे़यंदा विलंबाने पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली़ तालुक्यात ३० हजार ६३२ हेक्टर्सवर सोयाबीनचा पेरा झाला आहे़ त्यापाठोपाठ तुरीचा ३ हजार ७०० हेक्टर्स, खरीप -ज्वारीचा १ हजार ७१४ हेक्टर्सचा पेरा आहे़ शेतकऱ्यांनी महागामोलाचे बियाणे, खते व इतर औषधांचा वापर करून पेरण्या केल्या़ शेतकऱ्यांची सर्व भिस्त सोयाबीनवरच असताना एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तीस हजार आठशे हेक्टर्सपैकी जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणाची उगवणच झालेली नाही़ उगवणीअभावी शेतकरी हतबलगोविंद इंगळे ल्ल निलंगापेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकरी संकटात सापडला आहे़ दुबार पेरणीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याने हतबल झाला आहे़अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ आजपर्यंत केवळ ९३ मि़मी़पाऊस झाला आहे़ तालुक्यात खरीपाचे एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ६१ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात सोयाबीन ४६ हजार ५७५ हेक्टर आहे़ सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी निलंगा तालुक्यातून प्राप्त झाल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी़जे़ पाटील यांनी सांगितले़ आनंदवाडी (अबु़) गुऱ्हाळ, शिराढोण, शेडोल, वाळसा, शिरोळ (वां़), लांबोटा, सरवडी, अंबुलगा (वि), मुदगड (ए़), औंढा, नागंद, नेलवाड, हत्तरगा, गुंजरगा, येळणूर, मसलगा, हाडगा, राठोडा, दादगी, लिंबाळा, इनामवाडी, तगरखेडा, सावरी, माकणी आदींसह जवळपास सर्वच गावात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे़ एका एकरसाठी २ हजार ५०० रुपयांची बियाणाची बॅग, १२०० रुपयांचे खत पोते, १००० रू़ बैल बारदाणा व ३ मजुरांची ६०० रू़ मजूरी असे एकूण ५३०० रू ़ एकरी खर्च झाल्याचे येळणूरचे शेतकरी सिध्देश्वर सोळुंके यांनी सांगितले़दुहेरी अडचणएस़आऱमुळे ल्ल शिरूर अनंतपाळतालुक्यातील शेतकऱ्यांना अल्प पर्जन्य आणि घटलेली उगवणक्षमता असा दुहेरी फटका बसला असल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे़ दुबार पेरणी करण्यासाठी शेतकरी सावकाराच्या दारी खेटे घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकंदर लागवडीयोग्य जमीन २८ हजार ५०० हेक्टर्स असली तरी उसाचे क्षेत्र वगळता केवळ २३ हजार ८४९ हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे़ केवळ २१५ मि़मी़ सरासरी पाऊस झाल्याने खरीप हंगामावर फटका बसल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे़ यात दैैठणा, येरोळ, साकोळ, तिपराळ, कानेगाव, शेंद, तळेगाव, होनमाळ, लक्कडजवळगा, जोगाळा, तुरूकवाडी, कारेवाडी, धामणगाव, बोळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे़ तक्रारीनुसार भेटी देणे, पंचनामे करणे सुरु असल्याचे कृषी अधिकारी डी़ बी़ सुतार यांनी सांगितले़ पेर झाली उघडएम़जी़मोमीन ल्ल जळकोटपावसाअभावी व कंपन्यांच्या निकृष्ट बियाणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे़ त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे़ तालुक्यातील सुरुवातीच्या पावसावर एकूण क्षेत्रापैैकी ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ सध्या उघाड असल्याने तसेच काही ठिकाणी सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे़ वेळेत पेरणी व्हावी म्हणून काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरनी पेरणी केली आहे़ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी एकरी ८०० ते ८५० रूपये खर्च आला़ पेरणी करताना उताराला आडवी पेरणी तसेच प्रत्येक १० फुटावर मृतसरी काढणे, त्याचप्रकारे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे आदीबाबात कृषी अधिकारी बालाजी किरवले यांनी सांगितले़ पाऊस पडेल या आशेने सावकारी कर्ज काढून पेरणी केली़ हेक्टरी ६ हजार रूपये खर्च झाला आहे़ पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट आमच्यावर ओढावल्याने शासनाने मदत करावी, असे शेतकरी किशनराव तेलंग, विष्णुकांत काळे यांनी सांगितले़ येत्या एक-दोन दिवसांत पाऊस नाही पडल्यास या १२ हजार हेक्टर सोयाबीन पिकांवर नांगर फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाणाचा फटका बसला आहे़५० टक्के क्षेत्राचे बियाणामुळे नुकसानरमेश दुरुगकर/रमेश शिंदे ल्ल औसातालुक्यात तालुक्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांसमोर उभे आहे़ ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन बियाणेच उगवले नसल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे़ काही शेतकऱ्यांनी नशिबाला दोष देत पुन्हा दुसऱ्यांदा काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली आहे़ सामान्य शेतकरी मात्र खाजगी सावकारांकडे धाव घेत आहेत़औसा तालुक्यात जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी केली जाते़ यावर्षी तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाल्यामुळे उडीद मुगाच्या पेरणीचा हंगाम संपला़ त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ मागील दोन वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे़ २०१२-१३ च्या खरीप हंगामात ४६ हजार तर २०१३-१४ च्या खरीप हंगामात ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती, पण यावर्षी लांबलेला पाऊस पाणी विलंबाने होणाऱ्या पेरण्या यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली़ असून ५० हजार पेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापले आहे़कृषी विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे पेरण्याचे आवाहन केले होते़ त्यामुळे ६० टक्के क्षेत्रावर घरगुती तर ४० टक्के क्षेत्रावर बॅगमधील बियाणे पेरण्यात आले होते़ काही शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्याचे बियाणे पेरले, पण ते बियाणे उगवलेच नाही़ घरगुती बियाण्याच्या कमी पण बॅगमधील बियाणे उगवत नसल्याचा तक्रारी अधिक आहेत़ औसा पंचायत समिती कृषी विभागाकडे १९ जुलैपर्यंत १३० तक्रारी आल्याचे प़स़चे कृषी अधिकारी सतीश शिंदे यांनी सांगितले़पं़सक़ृषी विभागाचे कृषी अधिकारी सतिष शिंदे म्हणाले कि मी स्वत: विस्तार अधिकारी एम़डी़मुक्तापुरे, श्रीमती वर्षा शिंदे, सोमवाड सध्या पंचनामे करीत आहोत असे सांगितले तर ज्याची उगवण झाली नाही़ त्यांनी पंचनामे झाल्यानंतरच दुबार पेरणी करावी असे आवाहन शिंदे यांनी केले आहे़पेरले, पण उगवलेच नसल्याने धास्तीसंदीप अंकलकोटे ल्ल चाकूरतालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु, काही शेतकऱ्यांचे नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ तालुक्यात खरीपाचे क्षेत्र ५७ हजार ४२५ हेक्टर्स आहे़ या तालुक्यातील जवळपास ८० टक्के पेरणी झाली आहे़ त्यात नगदीचे पीक म्हणून यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनकडे वळला आहे़ पेरणी क्षेत्रावर ६० टक्केच क्षेत्र सोयाबीनची पेरणी आली आहे़ तूर २० टक्के, हायब्रीड १० टक्के तर इतर पिके १० टक्क्यात आहेत़ यावर्षी कृषी विभागाने सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याचे आवाहन केले होते़ घरगुती बियाणे पेरणी केली़ त्याची उगवण झाली मात्र बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाणाची उगवण बऱ्याच प्रमाणावर झाली नाही़चाकूर विभागात १०० टक्के पेरणी झाली़ वडवळ (नागनाथ) विभागात ९० टक्के तर नळेगाव व शेळगाव विभागात प्रत्येकी ८० टक्के पेरणी झाली आहे़ चाकूर तालुक्यात १९ जुलैपर्यंत १६१़६ मि़मी़ पाऊस झाला आहे़ सोयाबीन उगवले नसल्याच्या ९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ त्यापैैकी ७ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी टी़जीक़ासले यांनी सांगितले़बियाणांच्या ११ तक्रारीराम तत्तापुरे ल्ल अहमदपूरतब्बल सव्वा महिन्यानंतर तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ झाला़ नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाहीत़ त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडे ११ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३१ टक्के पाऊस झाला आहे़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली़ गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्यातच नामांकित कंपन्यांच्या बियाणांनी शेतकऱ्यांचा घात केल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे़ ३० हजार हेक्टरवर संकटरमेश कोतवाल ल्ल देवणीतालुक्यातील जवळपास तीस हजार हेक्टरच्या खरीप पेरणीवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे़ शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ या तालुक्यात यंदा एकूण क्षेत्राच्या तीस हजार चारशे हेक्टर क्षेत्रापैकी १९९५० हेक्टरवर सोयाबीन, ७८०२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे़ देवणी विभागात फक्त १८४ मि़मी़, वलांडी २७०, गोरोळ १६२ इतका झाला आहे़ अगोदर पेरण्या झालेल्यापैकी काहींनी दुबार पेरणीही केली आहे़ नामांकित कंपन्यांचे बियाणे न उगवल्याने व वेळवर पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात आहे़