शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आमचा थोडातरी विचार करा ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:20 IST

मागील तीन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेक डून ठेवीवरील आणि बचत खात्यांवरील व्याज दरात सातत्याने होणाºया कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून, याबाबत ज्येष्ठांकडून नाराजी व्यक्त होत आहे

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील तीन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेक डून ठेवीवरील आणि बचत खात्यांवरील व्याज दरात सातत्याने होणाºया कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून, याबाबत ज्येष्ठांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवृत्तीनंतर बहुतांश ज्येष्ठांचा महिन्याचा खर्च व्याजातून मिळणाºया पैशांवर अवलंबून असल्यामुळे ठेवीवरील व्याज दरात कपात करताना आमचा थोडा तरी विचार करावा, अशी मागणी अनेक ज्येष्ठांनी केली.रिझर्व्ह बँकेकडून ठेवीवरील व्याज दरात सातत्याने कपात करण्यात येत आहे. सध्या देशभरात २० कोटींपेक्षाही अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत.यापैकी सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांना निवृत्तीवेतन नियमितपणे मिळते. मात्र खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांची संख्या लक्षणीय असून, यापैकी काही ज्येष्ठांना अगदी नाममात्र निवृत्तीवेतन मिळते, तर काही ज्येष्ठांना कोणतेही निवृत्तीवेतन मिळत नाही.अशा ज्येष्ठांना निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युईटी या माध्यमातून काही रक्कम मिळालेली असते. अनेक ज्येष्ठांचे निवृत्तीनंतरचे जीवन याच पैशांवर अवलंबून आहे. उतारवयात उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने हे पैसे बँकेत ठेवून ज्येष्ठ नागरिक त्यातून मिळणाºया व्याजावर महिन्याचा खर्च भागवितात.सातत्याने कमी होणाºया व्याज दरामुळे ज्येष्ठांना दरमहा मिळणाºया रकमेतही साहजिकच कपात झाली आहे. यामुळे या वयात महिन्याचा आर्थिक ताळमेळ बसविताना नाकीनऊ येत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. उतारवयामुळे ९० टक्के ज्येष्ठांना रक्तदाब, मधुमेह, दमा, अस्थमा, हृदयविकार यासारख्या आजारांसोबतच वेगवेगळ्या व्याधीही जडलेल्या आहेत. त्यामुळे एक वेळ खायला कमी असले तरी चालेल, पण औषधींच्या बाबतीत केलेली कोणतीही हलगर्जी ज्येष्ठांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना महिन्याकाठी हजार रुपये औषधांसाठी बाजूला ठेवावेच लागतात.औषधींवर एवढा खर्च होत असेल, तर उरलेल्या पैशात घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांना पडला आहे. बचत खात्यांवरील रकमेवर आतापर्यंत ४ टक्के दराने व्याज दिले जायचे. मात्र या दरातही आता कपात करण्यात आली असून, ३.५ टक्के दराने व्याज मिळत आहे. यामुळे गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबांना फटका बसत आहे.