शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी रोखणाऱ्या किकवी धरणाचे टेंडर काढू नका

By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही,

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही, या आपल्याच धोरणाची पायमल्ली करणाऱ्या राज्य सरकारला औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या किकवी धरणासंबंधी कोणतीही निविदा काढू नये, असे अंतरिम आदेश न्या. आर. एम. बोर्डे, न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने दिले.राज्य शासनाने २००४ साली जाहीर केलेल्या धोरणामध्ये जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. या आपल्याच धोरणाची पायमल्ली करीत २०१६ साली नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने किकवी धरणाला परवानगी दिली. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात धरणे बांधण्यात आल्याने जायकवाडी धरण वेळेत भरत नाही. निधीअभावी ३० वर्षांपासून नांदूर -मधमेश्वर प्रकल्प रखडत ठेवून नाशिककरांसाठी हे धरण बांधले जात आहे. हे दोन्ही मुद्दे घेऊन विकास नामदेव लोळगे आणि बन्सीलाल यादव यांनी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने २१ आॅगस्ट रोजी जलसंपदा विभागाच्या सचिवांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी शपथपत्र सादर केले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागून घेतली. तेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किकवी धरणाची निविदा काढू नका, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला.