शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सातव्या दिवशीही कारण कळेना!

By admin | Updated: January 8, 2017 23:52 IST

जालना : सुमित्रा होंडे खून प्रकरणाचा गुंता रविवारीही कायम राहिला.

जालना : सुमित्रा होंडे खून प्रकरणाचा गुंता रविवारीही कायम राहिला. रविवारी दिवसभर पोलिसांनी आरोपी विलास होंडे याची कसून चौकशी केली. मात्र, खून मी केला आहे, या कबुली जबाबाव्यतिरिक्त काहीही विशेष माहिती विलासने पोलिसांना दिली नाही. घटनेच्या सातव्या दिवशीही कारणाचा उलगडा न झाल्याने पोलिसांवर तपासाचे दडपण वाढले आहे.पोलिसांनी सर्व बाजूंनी प्रश्न विचारुनही विलास खुनाचे कारण सांगत नसल्याने पोलिसांनी भावनिक पैलुची मदत घेत सलग दुसऱ्या दिवशीही विलास व त्याच्या बहिणीची भेट घडू देत तिच्या मदतीने त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. सोमवारी घटना घडून आठ दिवस पूर्ण होत असून, बुधवारी विलासच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांवरील तपासाचा दबाव कमालीचा वाढला आहे. सुमित्रा होंडे यांचा खून झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर होंडे कुटुंबीयाचे मूळ गाव तालुक्यातील साडेगाव येथे अत्यंसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्काराच्या दिवशी विलासने आपले स्वेटर व चप्पल आपल्या घरी सोडून दिली होती. शनिवारी पोलिसांनी विलासला साडेगाव येथे नेले व त्याठिकाणी असलेले त्याचे स्वेटर आणि चप्पल हस्तगत केली. खुनाच्या वेळी विलासने तेच स्वेटर घातलेले असल्याने त्या स्वेटरवर असलेली गन पावडर व चप्पलवर रक्ताचे काही डाग आहेत का, याची तपासणी करण्यासाठी या दोन्ही वस्तू पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)