शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

६० खाटांच्या स्त्री, बाल रुग्णालयाला भार सोसवेना !

By admin | Updated: January 14, 2015 00:55 IST

गजानन वानखडे , जालना येथील शासकीय स्त्री व बाल रूग्णालयाची क्षमता ६० खाटांची असताना भार मात्र १०० खाटांचा पडत आहे. कर्मचारी तेवढेच, रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याने रुग्णांची गैरसोय होत

गजानन वानखडे , जालनायेथील शासकीय स्त्री व बाल रूग्णालयाची क्षमता ६० खाटांची असताना भार मात्र १०० खाटांचा पडत आहे. कर्मचारी तेवढेच, रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहेच. सोबत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही त्याचा ताण पडत आहे. जिल्हातील आठही तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी हे परवडण्यासारखे रुग्णालय असल्याने रुग्णांची संख्या वाढते. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. सोनोग्राफी मशीन दोन वर्षापासून बंद असल्याने तपासणीसाठी हे रूग्ण शासकीय रुग्णालयाकडे जातात. तिथेही एकच सोनोग्राफी मशीन असल्याने स्त्री रुग्णालयाच्या पेशेंटना दहा-बारा दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार गरोदर महिलेने चार महिन्यानंतर बालकात काही व्यंग आहे का हे आणि प्रसुतीला काही दिवस शिल्लक असताना सोनोग्राफी करणे पुरेसे असते. पंरतु रूग्णांचे नातेवाईक अनेकवेळा आवश्यकता नसतांना देखील सोनोग्राफीची चिठ्ठी लिहून देण्याची मागणी वारंवार करतात. त्यामुळे मशीनवर ताण वाढतो. शिवाय या महिला व बाल रुग्णालयात रेडियोलॉजीस्टचे पदही नाही. त्यामुळे देखील मशीनमध्ये वारंवार बिघाड होतो, अशी माहिती रुग्णालयाचे अधिक्षक एस.आर पाटील यांनी दिली.