शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

समाज बांधणाऱ्या महापुरुषांच्या नावाने तेढ नको

By admin | Updated: April 9, 2015 00:13 IST

लातूर : महापुरुषांना कोणत्याही जातीत बांधण्याचा प्रयत्न करु नये. ते एका जातीचे नाहीत. अनुयायांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करुन समाज समृध्द करावा

लातूर : महापुरुषांना कोणत्याही जातीत बांधण्याचा प्रयत्न करु नये. ते एका जातीचे नाहीत. अनुयायांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करुन समाज समृध्द करावा. त्यांच्या नावावर समाजात तेढ होईल, असे वर्तन करु नये, असे आवाहन जिल्हा दक्षता समितीच्या वतीने ‘धार्मिक व जातीय सलोखा राखण्यासाठी समाजाचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात मान्यवरांनी केले. येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापौर अख्तर शेख, अतुल देऊळगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोेले, मौलाना इस्माईल काझी, मौलाना अलि साहाब, समाजकल्याणचे आयुक्त संजय दाणे, प्रादेशिक समाजकल्याण विभागाचे माधव वैद्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन परिसंवादाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, महापुरुष हे काही कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. पण अलिकडच्या काळात प्रत्येक जातींनी आपापल्या जातीतील महापुरुषांना जातीपुरते बांधून ठेवले आहे. यामुळे लोकही आपापल्या जातीपुरते संकुचित बनत आहेत. रोवलेला खुंटा जमीनीतून काढण्यासाठी हलवावा आणि तो पुन्हा घट्ट व्हावा अशी अवस्था जात आणि धर्माची झाली आहे. उत्सवात प्रदूषण होतेच पण समाजिक प्रदूषण जास्त चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी प्रत्येकांनी उत्सवाताला मंगल स्वरुप दिले पाहीजे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मार्गदर्शन करताना अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यांनी समाजात धार्मिक आणि जातीय सलोखा असणे ही निरोगी समाजाची बाब असल्याचे सांगितले. जाती आणि धर्म या बाबी पूर्णपणे वैयक्तिक आहेत. परंतु या माध्यमातून समाजात दुही पसरवली जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी महापौर अख्तर शेख, अतुल देऊळगावकर, अशोक चिंचोले, मौलाना इस्माईल कास्मी यांनीही आपले मनोगत वक्त केले.