शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगत्वाचा आघात संपूर्ण कुटुंबावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:19 IST

अमोल तांदळे , चौसाळा मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई

अमोल तांदळे , चौसाळा मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई या दाम्पत्यासमोर पडला आहे. मुलगा एकनाथ जन्मत:च दिव्यांग असल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी या दाम्पत्यावरच आहे. बीड तालुक्यातील चौसाळाजवळील ६० ते ७० उंबऱ्याचे गाव असलेल्या धोत्रा येथील दिव्यांग एकनाथची ही व्यथा आहे. २००५ दरम्यान संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग एकनाथला लाभ मिळावा यासाठी सीताबाई व रेवणनाथ यांनी बीड तहसीलकडे अर्ज केला होता. त्यानंतर अनेक वेळा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारले. मात्र, एकनाथला कवडीची मदत झाली नसल्याचे एकनाथची आई सीताबाई यांनी सांगितले. रेवणनाथ व सीताबाई यांना तीन अपत्ये आहेत. एकनाथ हा सर्वांत मोठा, त्यानंतरच्या भारतने परिस्थितीअभावी शिक्षण सोडून दुकानावर कामास लागला. तर तिसरा बाळासाहेब शिक्षण घेत असतानाच शेतीकडे वळला आहे. दिव्यांग एकनाथला शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी अर्ज-विनंत्या करूनही कुठलाही लाभ त्यांना मिळाला नाही. आईला शेतात काम करण्याची इच्छा असूनही घरातील दिव्यांग एकनाथकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे तीही हतबल आहे. एकीकडे अपंग नसलेले अपंगाच्या सवलती लाटत आहेत, तर दुसरीकडे एकनाथसारख्या खरे लाभार्थी त्यापासून वंचित आहेत.