शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पैठण शहरात गढूळ पाणीपुरवठा; आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:55 IST

: पैठण शहराला शुध्द पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॉरिफायर ( फॅक्युलेटर ) टँकमध्ये जवळपास आठ फूट गाळाचा थर साचला असून यामुळे पैठण शहराला गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण शहराला शुध्द पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॉरिफायर ( फॅक्युलेटर ) टँकमध्ये जवळपास आठ फूट गाळाचा थर साचला असून यामुळे पैठण शहराला गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकमधील गाळ काढण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू असून आणखी काही दिवस गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे. काम सुरू असल्याने नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी केले आहे.पैठण शहराला जायकवाडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील अनेक सयंत्रे जुनाट झाली आहेत. क्लॉरिफायर टँकची फिरती ब्रीज यंत्रणा गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. बेड वॉश जाम झाले आहेत. आलम (तुरटी) मिक्सर मोटार जाम झाली आहे. या परिस्थितीत ब्लिचिंग पावडर हाताने टाकण्यात येत असून आलम तुरटी मिसळण्यासाठी तात्पुरती यंत्रणा उभारून पाण्यात सोडण्यात येत आहे. या मुळे शहरवासियांना अशुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. अशुद्ध पाण्यामुळे विविध रोगाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. याबाबत ओरड झाल्याने नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा महेश जोशी, पाणीपुरवठा सभापती आशा आंधळे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने टँकमधील गाळ काढून दुरूस्ती करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई सुरू आहे. जायकवाडी धरणातील जलवाहिनीतून पाणी जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या शुद्धीकरण केंद्रात केली जाते. परंतु पाणी शुद्धीकरण केंद्रातील बरीच यंत्रणा बंद पडलेली आहे. तीन दिवसांपासून टँकमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसात टँकमधील ४ फूट गाळाचा थर काढण्यात आला आहे. आणखी दोन दिवस हे काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नगराध्यक्ष लोळगे यांनी पाहणी केली असता केंद्रातील कर्मचारी ठराविक अंतराने ब्लिचिंग पावडरची गोणी पाण्यात ओतत होता. हा प्रकार पाहून नगराध्यक्षांनी १०० लिटर पाण्यासाठी ५ ग्रॉम ब्लिचिंग पावडर याप्रमाणे गणित करून ब्लिचिंग पावडर टाका, असे आदेश दिले.