गजेंद्र देशमुख , जालनाजम्परोप या आंतरराष्ट्रीय खेळात जालना जिल्ह्यातील नेर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत जालना जिल्ह्याचा विशेष ठसा उमटविला. या राष्ट्रीय खेळाडूंची आता या वर्षी जागतिक आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या खेळाची विशेष दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात या खेळाचे खेळाडू सराव करत आहे. जम्परोप खेळाचा अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाने शालेय क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्याने जम्परोपचा भारतात झपाट्याने विकास होत आहे. शारीरिक व मानसिक तंदुरूस्तीसाठी अतिशय पोषक व त्याचप्रमाणे कमीत कमी वेळेत शारीरिक क्षमतेची चाचणी पाहणारा हा खेळ म्हणून पाहिले जात आहे. १४, १७, १९ व वरिष्ठ अशा चार गटात या स्पर्धा आयोजित केल्या जातात. जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा स्तरावर खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धा वैयक्तिक व सांघिक असे एकूण सहा प्रकार या खेळात आहे. वैयक्तिक मध्ये ३० सेकंद स्पीड, ३ मिनीट इंडोरन्स, डबल अंडर व फ्री स्टाईल असे चार प्रकार आहेत तर सांघिक मध्ये ३० सेकंद स्पीड रिले व डबल अंडर रिले हे दोन प्रकार आहेत. क्रीडा शिक्षक असलेले जालना जिल्हा जम्परोप संघाचे प्रशिक्षक उमेश खंदारकर हे राष्ट्रीय खेळाडू असून राज्यस्तरीय पंच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षापासून जालना जिल्ह्यात अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक, रौप्य पदक, व कास्यपदकांची कमाई खेळाडूंनी केली. जिल्हा क्रीडा संघटक श्रीकांत देशमुख यांचे मोलाचे सहकार्य आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतांना ग्रामीण व डोंगरी भागातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकविण्यास खंदाराकर यांचा मोठा वाटा आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत (जम्परोप) पदक प्राप्त खेळाडू खेळाडुचे नाव सुवर्णपदक रौप्य पदक कास्य पदकशेख मुज्जमिल सिराज०६०३०५पृथ्वीराज चव्हाण०१०२०६अभिषेक अकोलवाड०००१००बालाजी शेरकर०००१००राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूशेख मुज्जमिल सिराज०५०००४पृथ्वीराज चव्हाण०००१०४स्वप्नील चव्हाण०००००१
जंपरोप स्पर्धेत जिल्ह्याची जागतिक भरारी
By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST