शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा टँकरमुक्त

By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड मागील आठ दिवसांत जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयातील २६० टँकर, १६३ विहिरी तर ३४३ अधिग्रहीत बोअर प्रशासनाने बंद केले आहेत़ यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी

व्यंकटेश वैष्णव , बीडमागील आठ दिवसांत जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयातील २६० टँकर, १६३ विहिरी तर ३४३ अधिग्रहीत बोअर प्रशासनाने बंद केले आहेत़ यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसाला दहा लाख ३२ हजार ५०० रूपयांचा शासनाचा खर्च बंद झाला असल्याचे पाणी पुरवठा विभागातील सुत्रांनी सांगितले़एक एप्रिल पासून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता़ जून महिन्यापासून टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली़ आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात टँकरची संख्या २६० वर गेली होती़ यामध्ये २११ गावे तर ३११ वाड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती़ यात बीड, गेवराई, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी, केज, धारूर आदी तालुक्यांचा समावेश होता़ एप्रिल महिन्यापासून शासन टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत होते़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात२१़९३ मि़ मी़ पाऊस झाल्यामुळे टंचाई काळात बंद पडलेले पाण्याचे उदभव सुरू झाले आहेत. वाड्या, वस्त्यावरील हातपंप सुरू होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ मागील पाच महिन्यांत पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. एका टँकरला दिवसाकाठी तीन हजार रूपयाच्या जवळपास भाडे द्यावे लागायचे तर अधिग्रहीत केलेल्या बोअर व विहीरींना दिवसाकाठी पाचशे रूपये भाडे द्यावे लागत होते. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सांगितले की, जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची समस्या संपल्याने टँकर बंद केलेले आहेत.दहा दिवसांच्या पावसामुळे नदी, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न जवळपास मिटला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी पुढील तयारी करतील यात शंका नाही. मात्र सध्याचा पाऊस आणखी झाला तर ओला दुष्काळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.