उस्मानाबाद : मंजूर झालेल्या मायक्रो चॉकी योजना व डोअर टू डोअर निरजंतुकीकरण योजनेचे अनुदान देण्यासाठी २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून पैसे स्विकारणाऱ्या जिल्हा रेशीम विकास अधिकरी प्रियंका सदाशिव गणाचार्य यांना एसीबीने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी सायंकाळी रेशीम कार्यालयातच करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील चिंचोली (भु) येथील शेतकऱ्याने शेतात तुतीची लागवड केली आहे़ शेतकऱ्याने बाल्य किटक संगोपन (मायक्रो चॉकी) व डोअर टू डोअर निरजंतुकीकरण योजना मंजूर होवून अनुदान मिळण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे अर्ज दिला होता़ अनुदानाच्या मागणीबाबत तक्रारदाराने कार्यालयाकडे विचारणा केली होती़ त्यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रियंका सदाशिव गणाचार्य यांनी ‘तुमच्या दोन्ही योजना मंजूर झाल्या आहेत़ पण २५ हजार रूपये अणून द्या, त्यानंतरच दोन्ही योजनांचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होईल, नाहीतर योजनेचे अनुदान तुम्हाला काही केले तरी मिळणार नाही’ असे सांगितले़ तक्रारदाराने ‘मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, अनुदान द्या’, असे सांगितल्यावरही ‘२५ हजार रूपये घेऊन आल्याशिवाय तुला मंजूर योजनेचे अनुदान मिळणार नाही’ असे सांगितले़ त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची दखल घेवून एसीबीचे उपाधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रेशीम कार्यालयात सापळा रचला़ त्यावेळी प्रियंका गणाचार्य यांनी तक्रारदाराच्या कामासाठी २५ हजार रूपये लाचेची मागणी करून ते स्विकारल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली़ शहर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)४मायक्रो चॉकी योजना व डोअर टू डोअर निरजंतुकीकरण योजनेचे अनुदान देण्यासाठी केली होती पंचेवीस हजारांची मागणी.४वारंवार चकरा मारूनही अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्याने केली होती लाचलुचपत विभागाकडे तक्रार.४पंचेवीस हजारांची लाच स्वीकारताना केले जेरबंद.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी जेरबंद
By admin | Updated: January 7, 2015 01:00 IST