शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय ‘व्हेंटेलेटर’वर!

By admin | Updated: January 20, 2017 00:19 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामस्थांना आरोग्याची सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालय मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ‘व्हेंटेलेटर’ आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामस्थांना आरोग्याची सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालय मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ‘व्हेंटेलेटर’ आहे़ बंद पडणारी सिटीस्कॅन, एक्स-रे मशीन, एकाच सोनोग्राफी मशीनवर पडणारा दोन रुग्णालयांचा भार, अपुरे वैद्यकीय अधिकारी अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या जिल्हा रुग्णालयाला ग्रासले आहे़ मागील दीड-दोन वर्षात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले़ या कालावधीत आरोग्यविषयक वरील समस्या अपेक्षितरित्या सुटलेल्या नाहीत़ आता दिवाकर रावते यांनी पालकमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. जिल्हा रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याबाबत ते ठोस निर्णय घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दैनंदिन सरासरी एक हजार रुग्ण औषधोपचारासाठी येतात़ तर अंतररुग्ण विभागात २०० ते ३०० रुग्ण उपचार घेतात़ शिवाय ६० खाटाच्या स्त्री रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दैनंदिन १०० रुग्ण येत असून, अंतररुग्ण विभागात प्रसुतीसह इतर उपचारासाठी येणाऱ्या सरासरी १२० ते १४० महिला दाखल असतात़ स्त्री रुग्णालयाचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी या रुग्णालयासाठी स्वतंत्र सोनोग्राफी मशीन मिळालेली नाही़ परिणामी महिलांना सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते़ जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि महिला रुग्णालयातील रुग्णांची संख्या अधिक असल्याने सोनोग्राफीचा नंबर येण्यासाठी एक ते दोन आठवडे पुढील नंबर देण्यात येतो़ महिला नातेवाईकांना रात्रीच्यावेळी थांबण्यासाठी धर्मशाळेचे बांधकाम करण्यात आलेले नाही़ शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो़ तर रुग्णालयातील स्वच्छतागृहांचाही वापर करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत़ स्त्री रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता ६० खाटाच्या या रुग्णालयाला १०० खाटाच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ मात्र, हा प्रस्तावही धूळखात पडला आहे़जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे, सिटीस्कॅनची यंत्रणा जुनाट असल्याने कधी बंद पडेल याचा पत्ता लागत नाही़ या यंत्रणा बंद पडल्यानंतर रुग्णांना थेट खासगी ठिकाणी नेऊन सिटीस्कॅन, एक्स-रे करून घ्यावे लागत आहेत़ तर अपुरे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यामुळेही रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो़ रुग्णालयातील लिफ्ट बंद पडण्याचा प्रकार तर नवीन नाही़ दोन लिफ्ट असताना केवळ एक लिफ्ट सतत बंद असते़ ‘सिव्हील’सह महिला रूगणालयातील समस्या पाहता आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी दोन्ही रुग्णालयांना भेटी देऊन तत्कालीन पालकमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर मांडल्या होत्या. समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली होती. समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने बैठकीत निर्णयही झाला होता. परंतु, बैठक होवून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, समस्या जैैसे थे आहेत. दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही आरोग्यसेवा सुधारली नाही. त्यामुळे आता नूतन पालकमंत्री दिवाकर रावते हे तरी आरोग्य सेवा सुधारण्याच्या अनुषंगाने ठोस पाऊले उचलणार का? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.