बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, बीडही यामध्ये पिछाडीवर नाही, मात्र रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करीत बीड जिल्हा हा अपघात मुक्त करायचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परीवहन कार्यालय यांच्या संयूक्त विद्यमाने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जनजागृती रॅलीला उपप्रादेशिक परीवहन अधिकारी ए.ए.खान यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात केली. शिवाजी पुतळ्यापासून निघालेली रॅली, जालना रोड, सुभाष रोड, भाजी मंडई, बशीरगंज, नगररोड मार्गे आंबेडकर भवनात दाखल झाली, यावेळी समारोप कार्यक्रम झाला़यावेळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपअधीक्षक अभय डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान, सा.बां.चे कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर, उप अभियंता सतीश दंडे, उपअधीक्षक सुधीर खीरडकर, एन.डी.शिरगावकर, निरीक्षक रमेश घोडके, सहा़ निरीक्षक एम़ ए़ सय्यद यांची उपस्थिती होती.‘रस्ता सुरक्षा केवळ घोषवाक्य नसून ती जिवनशैली आहे’ हे यावर्षीच्या अभियानाचे ब्रीदवाक्य असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. अधीक्षक रेड्डी आणि जिल्हाधिकारी राम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायीच आहे, आणि यासाठी मुख्य घटक म्हणजे आजचे विद्यार्थी आणि वर्ग़ वाहतूक नियमांचे उल्लंघन न करता, देश आदर्श कसा बनेल यासाठी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही राम यांनी केले. अधीक्षक रेड्डी म्हणाले, स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवायचा असेल तर वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे़अंबर निंबाळकर, निवृत्ती एखंडे, बाबु फुले या पोलीस अधिकाऱ्यांसह आरटीओ कार्यालयातील महेश रायबान, शिवानी नागरगोजे उपस्थित होते़ बाबासाहेब जायभाये, विजयकुमार जाधवर, खय्युम कुरेशी, विठ्ठल देशमुख, नितिन शिंदे, दिनकर माने, विठ्ठल परजने, तात्यासाहेब बांगर, जालिंदर बनसोडे यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
जिल्हा अपघातमुक्त करायचाय
By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST