जालना : नानेगाव (ता. बदनापूर) येथील सरपंच मनोज कसाब यांच्या खूनप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दुपारी १ वाजता मामाचौक येथून या मोर्चास प्रारंभ झाला. सुभाष चौक, गरीबशहा बाजार, मस्तगड, गांधी चमन, शनिमंदिर, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मनोज कसाब यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, कसाब यांच्या साक्षीदारांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण मिळावे इत्यादी मागण्या केल्या. शिष्टमंडळाद्वारे या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना देण्यात आले. मोर्चात बहुजन रयत परिषदेचे कचरू साळवे, सर्जेराव जाधव, शिवाजी घुले, दशरथ साठे, दिलीप रोकडे, सुनील रोकडे, सी.के. डोईफोडे, सचिन खंदारे, दादाराव इल्पे, विठ्ठल अस्वले, अशोक जाधव आदी होते.
नानेगाव प्रकरणी जिल्हा कचेरीवर मोर्चा
By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST