शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

घरपोच सेवेच्या आदेशाकडे गॅस वितरकांचा कानाडोळा

By admin | Updated: June 5, 2014 00:49 IST

उस्मानाबाद : शहरातील गॅस एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडरची सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत.

उस्मानाबाद : शहरातील गॅस एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडरची सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत. मात्र आठवडा उलटला तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने ग्राहकांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. दुसरीकडे भर रस्त्यात सिलेंडर वाटप सुरू असल्याने सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठवड्यात गॅस एजन्सीधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, वजन-मापे निरीक्षक यांच्यासह एजन्सीधारकांची उपस्थिती होती. शहरी भागातील गॅस एजन्सीधारकांनी ग्राहकांना घरपोच सिलेंडरचा पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र पैसे घेऊनही गॅस एजन्सीधारक असा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. शहरातील ठराविक पार्इंटवर सिलेंडरची गाडी आणून तेथूनच त्या परिसरातील ग्राहकांना सिलेंडर दिले जात आहेत. यामुळे लेडिज क्लबसमोरील रस्ता तसेच बार्शी बायपास व अन्य ठिकाणी ग्राहक गर्दी करीत असल्याने वाहतुकीबरोबरच सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याबाबतचा प्रश्न गॅस एजन्सीधारकांच्या बैठकीत उपस्थित झाल्यानंतर ग्राहकांना घरपोच सेवा पुरविणे एजन्सीधारकांची जबाबदारी असून, ती सुरक्षित पार पाडावी, घरपोच सेवा देण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले होते. यावेळी त्यांनी एजन्सीधारकांचे म्हणणेही ऐकून घेतले. मात्र त्यानंतरही शहरात घरपोच सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. उस्मानाबादसह जिल्ह्यातील इतर शहरातही अशीच अवस्था असून, प्रशासनाने केवळ घोषणा न करता कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. (जि.प्र.)