शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सहा म्हशींवर आले विघ्न, आता कसे करावे मुलीचे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST

पैठण : पाचोड रोडवरील ओढ्यात शनिवारी दुपारी पाणी पिण्यासाठी उतरलेल्या म्हशींवर महावितरणची विद्युत तार तुटून पडल्याने सहा म्हशी ...

पैठण : पाचोड रोडवरील ओढ्यात शनिवारी दुपारी पाणी पिण्यासाठी उतरलेल्या म्हशींवर महावितरणची विद्युत तार तुटून पडल्याने सहा म्हशी मरण पावल्या. या सहा म्हशी शंकर सदाशिव काटकर यांच्या मालकीच्या होत्या. पाच दिवसांनंतर त्यांच्या मुलीचे लग्न होते. या सहापैकी दोन म्हशी विकून ते मुलीच्या लग्नासाठी पैसा उभा करणार होते; परंतु या घटनेमुळे ते आर्थिक संकटात सापडले असून, आता मुलीचे लग्न कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पैठण शहरातील शंकर काटकर (रा. इंदिरानगर) यांच्या मालकीच्या पाच म्हशी, एक रेडा व गायीला शनिवारी नेहमीप्रमाणे पाचोड रोडवरील परिसरात चरण्यासाठी सोडले होते. यादरम्यान गाय वगळता सर्व जनावरे परिसरातील ओढ्यात पाणी पिण्यासाठी पाण्यात उतरली. दुर्दैवाने ओढ्यावरून जाणारी महावितरणची तार अचानक तुटून ओढ्याच्या पाण्यात पडली. तारेत विद्युत प्रवाह सुरू असल्याने पाण्यातील सहा म्हशी तडफडून मरण पावल्या. ओढ्याच्या किनाऱ्यावर बसलेल्या गायीलासुद्धा विद्युत धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, नगरसेवक ईश्वर दगडे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युतपुरवठा बंद करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने म्हशींना पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास भुजंग यांनी म्हशींचे शवविच्छेदन केले.

एकाच वेळी सहा म्हशी मरण पावल्याने शंकर काटकर यांच्या परिवाराने फोडलेला हंबरडा उपस्थितांना हेलावून गेला. महावितरणने संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

-------- म्हशींवरच उदरनिर्वाह ----

इंदिरानगरातील शंकर काटकर यांचा उदरनिर्वाह याच म्हशींवर अवलंबून होता. म्हशींचे दूध विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय असल्याने या घटनेमुळे त्यांच्यावर अचानक आभाळ कोसळले. या संकटाने काटकर परिवार हादरून गेला. यात जवळपास सहा लाखांच्या म्हशी मरण पावल्या असून, उदरनिर्वाहाचे साधनही त्यांच्या हातातून गेले आहे.

-------- सात तारखेला मुलीचे लग्न ---

शंकर काटकर यांच्या मुलीचा विवाह ७ जानेवारी रोजी होणार आहे. सहापैकी दोन म्हशी विकून विवाहाचा खर्च करण्याचे त्यांनी ठरविले होते. दुर्दैवाने सहाही म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्यावर संकट कोसळले असून, विवाहाचा खर्च कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शंकर काटकर यांचा मुलगा म्हशीमागे होता. म्हशी पाण्याबाहेर काढण्यासाठी तो पाण्यात जात असताना त्याला मोबाइलवर कॉल आल्याने तो बोलत थांबला. नेमकी त्याच वेळी पाण्यात तार तुटून पडली व पुढील अनर्थ टळला.